• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Pollution Levels In 17 Cities Exceed National Limits Mumbai Mmr Situation Alarming

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक

महाराष्ट्रातील १७ शहरांनी PM 2.5 ची राष्ट्रीय मर्यादा (४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) ओलांडली आहे आणि सर्व शहरांमध्ये PM 10 ची पातळी 'राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांपेक्षा अधिक आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 13, 2025 | 06:45 PM
१७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे (Photo Credit - X)

१७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘एन्वारोर्केटलिस्ट’ आणि CPCB च्या अहवालातून धक्कादायक खुलासा
  • NCAP निधीचा अपुरा वापर
  • हिवाळ्यात आरोग्याला गंभीर धोका

मुंबई: राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये धूलिकणांची (पार्टिक्युलेट मॅटर – PM) पातळी राष्ट्रीय मर्यादेपेक्षा (National Standards) जास्त असून, विशेषतः मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. ‘एन्वारोर्केटलिस्ट’ आणि ‘वातावरण फाऊंडेशन’ यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) गेल्या आठ वर्षांच्या आकडेवारीवर आधारित संयुक्त अहवाल नुकताच सादर केला आहे.

या अहवालानुसार, वायू प्रदूषणाच्या संकटात महाराष्ट्रातील सर्व शहरांचा समावेश झाल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील १७ शहरांनी PM 2.5 ची राष्ट्रीय मर्यादा (४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) ओलांडली आहे आणि सर्व शहरांमध्ये PM 10 ची पातळी ‘राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांपेक्षा अधिक आहे.

मुंबई आणि MMR: निधी असूनही प्रदूषण कायम

मुंबई आणि MMR परिसरातील स्थिती निधीचा वापर न झाल्यामुळे अधिक बिघडल्याचे दिसून येते

निधीचा तपशील माहिती
NCAP अंतर्गत मंजूर निधी ९३८.५९ कोटी रुपये
वास्तविक वापरलेला निधी ५७४.६४ कोटी रुपये
  • मुंबईतील पातळी: मुंबईत PM 2.5 पातळी ३५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि PM 10 पातळी ९१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली आहे. जरी ही पातळी राष्ट्रीय मर्यादेत असली तरी, ती जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मानकापेक्षा सातपट जास्त आहे.
  • उपाययोजनांचा अभाव: ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम’ (NCAP) अंतर्गत मंजूर निधीचा मर्यादित वापर आणि स्थानिक पातळीवरील नियोजनाचा व समन्वयाचा अभाव यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याचे अहवालात नमूद आहे.
  • हिवाळ्यातील धोका: या सर्व शहरांमध्ये हिवाळ्यात प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवते.

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

MMR मधील शहरांची धोकादायक स्थिती

ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण, उल्हासनगर, विरार आणि बदलापूर या MMR मधील शहरांची परिस्थितीही धोकादायक आहे:

  • नवी मुंबई: येथे PM 10 पातळी १०२ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपर्यंत पोहोचली असून, गेल्या पाच वर्षांत यात सुमारे दुप्पट वाढ झाली आहे.
  • ठाणे: PM 2.5 प्रदूषक ३८ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर, तर PM 10 हे ८३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवले गेले आहे. बांधकाम आणि वाहतुकीतील धूळ हे प्रमुख कारणे आहेत.
  • उपनगरांमधील वाढ: मीरा-भाईंदर आणि विरारमध्ये PM 2.5 हे ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त झाले असून, उपनगरांतील हवा महानगराइतकीच प्रदूषित असल्याचे स्पष्ट होते.
  • अति धोका: बदलापूर, भिवंडी आणि बेलापूरमध्ये PM 10 पातळी १०० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त झाली असून, हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचते.

उपाययोजनांची वेळ आली आहे

‘एन्वारोकॅटलिस्ट’चे संस्थापक सुनील दहिया यांनी इशारा दिला आहे की, महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमध्ये धूलिकणांची पातळी धोकादायक आहे. आता ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या’ मर्यादेपलीकडे जाऊन प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना कठोरपणे राबवण्याची वेळ आली आहे.

JJ Hospital: जेजे रुग्णालयातील आरोग्यसेवेला खीळ; MRI मशीन बंद पडल्याने प्रतीक्षा थेट ‘तीन महिन्यांवर’

अहवालातील मुख्य शिफारसी:

  • जास्त प्रदूषित, पण ‘नॉन-NCAP’ शहरांचा कार्यक्रमात तातडीने समावेश करणे.
  • हिवाळ्यापूर्वी अनिवार्य ‘हंगामी कृती आराखडा’ (Seasonal Action Plan) लागू करणे.
  • निधीचे वितरण कामगिरीच्या आधारे करणे.
  • हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रांचा विस्तार करणे.
  • बांधकाम, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि औद्योगिक उत्सर्जन नियंत्रणासाठी समन्वय वाढवणे.

Web Title: Pollution levels in 17 cities exceed national limits mumbai mmr situation alarming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • Air Pollution
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
1

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

“मी किती निकालपत्रे लिहू?”  धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना देण्याविरुद्धच्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी असे का म्हटलं?
2

“मी किती निकालपत्रे लिहू?”  धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना देण्याविरुद्धच्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी असे का म्हटलं?

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Mumbai Crime: दुर्दैवी! मुंबईत उंच इमारतीतून लोखंडी रॉड पडून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू
4

Mumbai Crime: दुर्दैवी! मुंबईत उंच इमारतीतून लोखंडी रॉड पडून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IPL 2025 Auction: आयपीएल २०२६ च्या लिलावाची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी, ‘या’ देशात रंगणार लिलाव!

IPL 2025 Auction: आयपीएल २०२६ च्या लिलावाची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी, ‘या’ देशात रंगणार लिलाव!

Nov 13, 2025 | 08:24 PM
Russia Ukraine War : तुर्कीच्या मध्यस्थीने होणार युक्रेन युद्धबंदी? जे ट्रम्प करु शकले नाहीत, एर्दोगान यांना जमेल का?

Russia Ukraine War : तुर्कीच्या मध्यस्थीने होणार युक्रेन युद्धबंदी? जे ट्रम्प करु शकले नाहीत, एर्दोगान यांना जमेल का?

Nov 13, 2025 | 08:20 PM
डायबिटीजला 2 स्टेप्समध्येच करा रिव्हर्स, सायलेंट किलरपासून वाचण्यासाठी एक्सपर्टने सांगितले उपाय

डायबिटीजला 2 स्टेप्समध्येच करा रिव्हर्स, सायलेंट किलरपासून वाचण्यासाठी एक्सपर्टने सांगितले उपाय

Nov 13, 2025 | 08:15 PM
Kolhapur News : ‘चुटकीवाला बाबा’ची भोंदूगिरी ; निवडणुकीच्या तोंडावर स्मशानभूमीत भूतबाधा उतरविण्याचा प्रकार

Kolhapur News : ‘चुटकीवाला बाबा’ची भोंदूगिरी ; निवडणुकीच्या तोंडावर स्मशानभूमीत भूतबाधा उतरविण्याचा प्रकार

Nov 13, 2025 | 08:10 PM
Google चा सर्वात मोठा इशारा! पब्लिक Wi-Fi वापरताना सावधान, अन्यथा मोठे नुकसान होईल

Google चा सर्वात मोठा इशारा! पब्लिक Wi-Fi वापरताना सावधान, अन्यथा मोठे नुकसान होईल

Nov 13, 2025 | 08:08 PM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

Nov 13, 2025 | 07:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM
Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Nov 13, 2025 | 07:26 PM
Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Nov 13, 2025 | 07:19 PM
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM
जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

Nov 13, 2025 | 03:03 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.