मुंबई : रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (RGICL), ही भारतातील अग्रगण्य सामान्य विमा कंपन्यांपैकी एक खासगी कंपनी असून सर्वात लवचिक आणि गरजेनुरूप आरोग्य विमा पॉलिसी (Insurance Policy) – रिलायन्स हेल्थ गेन लाँच (Reliance Health Gain Launch) करण्यात आली. ही पॉलिसी ग्राहकांना त्यांच्या गरजेनुरूप आणि निवडीनुसार भरणा करण्याचच्या पर्यायासह आरोग्य विमा पॉलिसी डिझाईन करण्याची संधी देते.
आरजीआयसीएल प्लस, पॉवर आणि प्राइम असे तीन वेगवेगळे प्लान घेऊन आली आहे. सोबतच प्रत्येक ग्राहकासाठी त्याच्या गरजेनुरूप वैशिष्ट्यांचे पर्याय उपलब्ध करून देते. या लाँचसोबत रिलायन्स जनरलचे ध्येय सर्व वयोगटातील आधुनिक युगातील ग्राहकांच्या बदलत्या आणि अभिनव वैद्यकीय गरजांकडे लक्ष देण्याचे आहे.
रिलायन्स हेल्थ गेनने दुहेरी कवच (डबल कव्हर) सारखी उद्योग क्षेत्रातील 38 वैशिष्ट्ये समाविष्ट केल्याने एकाच दाव्यात विमा रकमेच्या दुप्पट कवच उपलब्ध होईल; खात्रीशीर संचयित बोनस, दावा-
पश्चात संचयित बोनसवरील नुकसानाला संरक्षण देते; किंवा पूर्वीपासून असलेल्या आजाराकरिता प्रतीक्षा कालावधी 3 वर्षावरून 2 किंवा अगदी 1 पर्यंत कमी करता येतो. अशाप्रकारच्या अनेक लाभांसह, हे उत्पादन आधुनिक आरोग्य-विमा ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे.
[read_also content=”PHOTO : Truke चे प्रिमिअम आणि आकर्षक ‘एफ१ इअरबड्स’ लाँच; आयपीएक्स ४ रेटिंगसह आहेत वॉटर-रेसिस्टण्टही https://www.navarashtra.com/photos/photo-truke-launches-premium-and-attractive-f1-earbuds-they-are-also-water-resistant-with-ipx4-rating-nrvb-285411.html”]
या लाँचबद्दल उत्साहात बोलताना आरजीआयसीएलचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राकेश जैन म्हणाले की, “आरोग्य विमा स्वीकारण्याकडे लोकांचा कल महासाथीनंतर वाढला आहे. लोक आधुनिक उपचारांविषयी अधिक सजग झाले आहेत आणि आरोग्य देखभाल खर्चही भरमसाठ वाढले आहेत. मात्र अजूनही योग्य विमा कवचाची निवड करणे ही बहुसंख्य ग्राहकांसमोरील समस्या ठरते. रिलायन्स हेल्थ गेन पॉलिसीसह, आम्हाला ग्राहकांना ‘निवड शक्ती’ प्रदान करायची आहे. जेणेकरून हे ग्राहक स्वत:च्या गरजेनुरूप आरोग्य विम्याचे आरेखन (डिझाईन) करू शकतील. रिलायन्स हेल्थ गेन पॉलिसी ग्राहकांना निवड करण्याचे स्वातंत्र्य देईल, सोबतच त्यांचे स्वत:च्या आरोग्य विमा पॉलिसीवर नियंत्रण राहील, याविषयी आम्ही सकारात्मक आहोत. ‘मेक युअर ओन पॉलिसी’ (स्वत:ची पॉलिसी तयार करा) हा एक भविष्यगामी नमुना असून सर्वोत्तम पारदर्शकता आणि वृद्धिंगत विश्वास हेच आमचे ध्येय आहे.”
ग्राहक नवीन, नेहमीचे किंवा श्रीमंत कोणत्याही वर्गातील असले, तरीही ही खासकरून डिझाईन करण्यात आलेली पॉलिसी 3 लाखांपासून ₹1 कोटींपर्यंत विस्तृत विमा रक्कम पर्याय उपलब्ध करून देते. वयवर्ष 18 ते 65 पर्यंतच्या ग्राहकांसाठी कोणत्याही विमा रकमेकरिता कोणताही पर्याय उचलून निवडण्याची मुभा आहे. त्याशिवाय ₹3 लाखांपर्यंतच्या विमा रक्कम पॉलिसीकरिता वयाची कोणतीही मर्यादा नाही. या निकषापोटी बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय विमा नाकारला जातो. त्यांच्याकरिता संरक्षणाचा हेल्थ गेन पर्यायाची निवड अगदी सहज करता येते. त्याशिवाय, ही पॉलिसी अभिनव वैशिष्ट्य प्रदान करते, ज्यात ग्राहकाला कुटुंबातील 12 व्यक्तिना (जसे की, वडील/ आई/ सासरे/ सासू/ मुलगी किंवा जावई, आजी-आजोबा, नातवंडे आणि तत्सम अनेक नाती)
विमा-कवच उपलब्ध करून देता येते.
ही पॉलिसी 50 वर्षे वयाखालील ग्राहकांसाठी आरोग्यवान ग्राहकांना लाभाची अभिनव सवलत घेऊन आली आहे. उदाहरणार्थ, ग्राहकाला पॉलिसी घेतेवेळी कोणताही पूर्व-आजार नसल्यास 2/3 वर्षाच्या दीर्घकालीन पॉलिसीच्या हप्त्यावर (प्रीमियम) 15%ची सवलत मिळू शकते. आपला पाठिंबा युवा महिलांना देत, मुलीचा विमा काढणाऱ्या किंवा प्रस्तावक एखादी महिला असल्यास 5%पर्यंतची सवलत मिळणार आहे. रिलायन्स हेल्थ गेन पॉलिसी क्षेत्र-नुरूप किंमत नमुन्यासह येते. याचा अर्थ ग्राहक ज्या शहरात/गावात राहत असेल, तेथील वैद्यकीय खर्चाप्रमाणे
⇒ एकसमान दाव्यावर दुहेरी कवच
⇒ खात्रीशीर संचयित बोनस
⇒ पूर्वीपासून असलेल्या आजाराकरिता कमी प्रतीक्षा कालावधी
⇒ रकमेच्या 100% पर्यंत अत्याधुनिक उपचार
⇒ आधारभूत विमा रकमेची अमर्यादित पुनर्स्थापना
⇒ 3 लाख ते ₹1 कोटींचा विस्तृत विमा रक्कम पर्याय
⇒ रुग्णालय रोख आणि उपभोग्य कवच
⇒ रुग्णालय खोलीच्या भाड्याची सुधारीत मर्यादा
⇒ साल-दरसाल नूतनीकरणावर लॉयल्टी लाभ