मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने एडवर्ब टेक्नोलॉजीज या कंपनीला जवळपास 74 अब्ज रुपयांच्या रोबोट्सची ऑर्डर दिली आहे. हे सगळे रोबोट्स 5जी टेक्नोलॉजीवर आधारीत असणार आहे. या रोबोट्सचा वापर रिलायन्सच्या जामनगर येथील रिफायनरीमध्ये करण्यात येणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने काही दिवसांपूर्वीच रोबोटिक्स स्टार्टअप Addverb Technologies मध्ये 54 टक्के भागिदारी खरेदी केली होती. हा व्यवहार रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात आला होता. रिलायन्स रिटेलने हा करार 985 कोटींमध्ये केला होता.
[read_also content=”रश्मी ठाकरेंनी ग्रामपंचायतीला लिहिले पत्र आणि किरीट सोमय्या यांनी सादर केलेला पुरावा; अलिबागमधील 19 बंगल्यांचा वाद चिघळणार https://www.navarashtra.com/latest-news/letter-written-by-rashmi-thackeray-to-gram-panchayat-and-evidence-presented-by-kirit-somaiya-the-dispute-over-19-bungalows-in-alibag-will-simmer-nrvk-242712.html”]
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजने रोबोट्सच्या माध्यमातून 5जी शी निगडीत प्रयोगही करणार आहे. एडवर्बच्या डायनेमो 200 रोबोट्स याआधीपासून जामनगर रिफायनरीमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा वापर इंट्रा-लॉजिस्टिक्स ऑपरेशनसाठी करण्यात येत आहे. हे सर्व रोबोट्स 5 जी तंत्रज्ञानावर आधारीत आहे. त्यांना अहमदाबाद येथील नियंत्रण कक्षातून करण्यात येते.