फोटो सौजन्य- pinterest
आजचा रविवारचा दिवस चांगला राहील. आज रविवारचा दिवस असल्याने आजचा दिवस सूर्य ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्य ग्रहाचा प्रभाव राहील. आज महाशिवरात्र आहे. आज मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल आणि मूलांक 8 असणाऱ्या लोकांना कामामध्ये अपेक्षित यश मिळू शकते. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्याकडून पाठिंबा मिळेल आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी वाद घालणे टाळावे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आरोग्याच्या समस्येमुळे तुमच्यावर तणाव येऊ शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आज नातेसंबंध चांगले राहतील.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कला, लेखन याच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबातील लोकांची जबाबदारी वाढू शकते. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नातेसंबंध चांगले राहतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगले राहील.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील दुसऱ्याची मदत करणे फायदेशीर राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. आज आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. धार्मिक कार्यात अपेक्षित यश मिळेल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन डील होऊ शकते. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






