गुजरातमध्ये भीषण अपघात (फोटो- istockphoto)
गुजरातच्या वलसाडमध्ये झाला भीषण अपघात
कार आणि ट्रकमध्ये जोरदार टक्कर
जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू
वलसाड: गुजरात राज्यातील वलसाडमध्ये भीषण अपघात झाला आहे. एका कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. वलसाड जिल्ह्यातील कपराडा तालुक्यातील कुंभघाटच्या जवळ एक मोठा अपघात घडला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एक वेगवान असलेली कार आणि ट्रकमध्ये टक्कर झाली. यामध्ये ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.
झालेला अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. यामध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीचा आवाज ऐकून जवळील स्थानिक लोक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य करण्यास सुरूवात केली. हा अपघात कापरोडा नानापोंधा राज्य महामार्गावर घडला आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन या ठिकाणी दाखल झाले. या घटनेत ५ प्रवाशांनी जागीच आपले प्राण सोडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. त्याला जवळील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ट्रक ड्रायव्हरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…
मुंबई -गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा अपघात
मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे मुंबई ते रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव गाडीने दुचाकी, कारसह चार जणांना जोरदार धडक दिली. या अपघातात तीन पादचारी जखमी झाले, तर एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली. याबाबत सावर्डे पोलिस ठाण्यात नोंद झाली.
विजय बाबाराम सावर्डेकर (रा. असुडें रोहिदासवाडी, वय ५४) असे मृताचे नाव आहे. तर अंजली पवार, सुभाष जाधव, सतीश हुमणे अशी जखमी झालेल्या पादचाऱ्यांची नावे आहेत. गिरीश चंद्रकांत गावडे (वय ४१, रा. मुंबई) आपल्या ताब्यातील कार मुंबई ते रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने घेऊन चालला होता. असुर्डे येथे आला असता दुचाकी व चारचाकी गाडीला जोरदार धडक देत दुचाकीस्वारासह तीन पादचाऱ्यांना धडक दिली.
Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू
गावावर शोककळा
अपघात इतका भीषण होता की या अपघातात तीन पादचारी जखमी झाले. तर एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सावर्डे पोलिसांना माहिती दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातातील जखमीना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान, या अपघातात विजय बाबाराम सावर्डेकर यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले.






