SBI कडून सरकारला लाभांश
नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी बँक अशी ओळख असलेल्या एसबीआयने सरकारला चांगली रक्कम दिली आहे. ही रक्कम 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आहे. एसबीआयने सरकारला 8076.84 कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. 2024-25 मध्ये बँकेने 70,901 कोटी रुपयांचा विक्रमी नफा मिळवला आहे. त्यानंतर बँकेने आता इतक्या मोठ्या रकमेचा लाभांश दिला आहे.
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक देशातील सर्वांत मोठी अशी बँक आहे. गेल्या वर्षी या बँकेचा नफा ६१,०७७ कोटी रुपयांचा होता. अशाप्रकारे बँकेचा नफा १६ टक्क्यांनी वाढला आहे. एसबीआयच्या नफ्यात झालेली वाढ ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली बाब आहे. यावरून बँकेची वाटचाल योग्यरितीने जात असल्याचे दिसून येत आहे. एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. सेट्टी यांनी या रकमेचा हा धनादेश अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे सुपूर्द केला आहे. वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू आणि वित्त सचिव अजय सेठ देखील यावेळी उपस्थित होते.
Smt @nsitharaman receives a dividend cheque of Rs 8076.84 crore for FY 2024-25 from Shri CS Setty, Chairman – @TheOfficialSBI. pic.twitter.com/y5rfZHTKAV
— Nirmala Sitharaman Office (@nsitharamanoffc) June 9, 2025
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. SBI ने यावर्षी प्रति शेअर ₹ १५.९० लाभांश दिला आहे. गेल्या वर्षी ही रक्कम प्रति शेअर ₹ १३.७० होती. याचा अर्थ असा की यावेळी भागधारकांना जास्त फायदा झाला आहे. गेल्या वर्षी SBI ने सरकारला ₹ ६,९५९.२९ कोटी लाभांश दिला होता. यावेळी ही रक्कम आणखी जास्त आहे.
सरकारच SBI मध्ये सर्वात मोठा भागधारक
सरकार SBI मध्ये सर्वात मोठा भागधारक आहे. बँकेचे सुमारे ५७.४२ टक्के इक्विटी शेअर्स आहेत. सरकारी विमा कंपनी LIC कडे बँकेचे ९.०२% शेअर्स आहेत आणि ती बँकेत सर्वात मोठी नॉन-प्रमोटर शेअरहोल्डर आहे. बँकेचे शेअर्स NSE आणि BSE दोन्हीवर सूचीबद्ध आहेत.