85,000 इंजिनिअर्सची फौज... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली मोठी योजना; 60 लाख नोकऱ्यांचे लक्ष्य!
पंतप्रधान मोदी यांनी आज (ता.११) देशभरातील गुंतवणूकदार आणि सेमीकंडक्टर उद्योगातील भागधारकांना या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. ग्रेटर नोएडा येथे आयोजित सेमीकॉन इंडिया 2024 समिटमध्ये सेमीकंडक्टर उद्योग तज्ञांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. भारत हा जगातील 8 वा देश आहे. ज्या ठिकाणी हा ग्लोबल सेमीकंडक्टर इनिशिएटिव्ह सुरू होत आहे. त्यासाठी 85 हजार इंजिनिअर्स, अभियंते आणि संशोधन आणि विकास तज्ञांचे सेमीकंडक्टर कार्यबल तयार केले जात आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
हे देखील वाचा – रिलायन्सच्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी; कंपनी एकावर एक शेअर फ्री देणार!
येत्या काळात मोबाईल निर्यातीचे उदाहरण देताना मोदी म्हणाले की, भारत हा 5G फोनचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. भारताचे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र आता 150 अब्ज डॉलरचे झाले आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला 500 अब्ज डॉलर्सचा उद्योग बनवून, येत्या काळात 60 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे सेमीकंडक्टर उद्योगालाही मदत होणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
तत्पूर्वी बुधवारी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या सरकारी निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली सेमीकॉन उद्योगातील तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवतेच्या कल्याणासाठी लोकशाही आणि तंत्रज्ञान यांना एकमेकांशी जोडले पाहिजे, असे सुचवले आहे. व्यवसाय आणि भारताचे भविष्य घडवण्यात तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर मोदींनी यावेळी चर्चा केली. डिजिटल युगाचा पाया म्हणून सेमीकंडक्टर्स अगदी मूलभूत गरजांसाठीही लवकरच आवश्यक होतील यावर त्यांनी भर दिला आहे.
सेमिकॉन उद्योगातील तज्ञांशी त्यांच्या वन-टू-वन संवादादरम्यान, मोदींनी या उद्योगासाठी प्रशिक्षित कार्यबल उपलब्ध आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी भारताच्या टॅलेंट पूलला संबोधित करण्यासाठी सरकारच्या कौशल्य विकासाच्या लक्ष्यावर प्रकाश टाकला. या बैठकीला SEMI, Micron, NXP, PSMC, IMEC, Renesas, TEPL, Tokyo Electron Ltd, Tower, Synopsys, Cadence, Rapidus, Jacobs, JSR, Infineon, Advantest, Teradyne, Applied या कंपन्यांचा समावेश होता.