'या' नामांकित कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात खुला; वाचा... कितीये किंमत पट्टा!
लॉजिस्टिक कंपनी वेस्टर्न कॅरिअर्स (इंडिया) लिमिटेडचा आयपीओ 13 सप्टेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला होईल. हा आयपीओ कागदपत्रांनुसार कोलकाता आधारित कंपनीचा आयपीओ 18 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. मोठे (अँकर) गुंतवणूकदार 12 सप्टेंबर रोजी शेअर्ससाठी बोली लावू शकतील. या आयपीओच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स विक्रीसाठी जारी केले जातील. तसेच 54 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे विकले जातील. विद्यमान भागधारक ओएफएसद्वारे आयपीओमध्ये शेअर्सची विक्री करतात.
कधी होणार लिस्टिंग?
जेएम फायनान्शियल आणि कोटक महिंद्रा कॅपिटल हे वेस्टर्न कॅरिअर्सच्या आयपीओचे व्यवस्थापक आहेत. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनीची लिस्टिंग 23 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा मेनबोर्ड आयपीओ आहे. प्राइस बँड आणि लॉट साइज जाहीर करण्यात आली नाही. वेस्टर्न कॅरियर्सच्या आयपीओसाठी शेअर्सची प्राईज बँड अद्याप जाहीर केलेली नाही. त्याचवेळी लॉटची साईज किती शेअर्सची असेल, याचीही माहिती समोर आलेली नाही.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – दोन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार पुन्हा ढासळला; ‘या’ शेअर्समध्ये मोठी घसरण!
काय असते आयपीओची प्रक्रिया?
– एखादी कंपनी ठरवते की ती आयपीओ लॉन्च करेल आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड होईल.
– त्यासाठी ते आयपीओ लॉन्च करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे अर्ज करतात.
– सेबीकडून मंजुरी मिळाल्यानंतर कंपन्या आयपीओ लॉन्च करतात. आयपीओचे दोन भाग आहेत.
– पहिल्या भागात संस्थात्मक गुंतवणूकदारांना (अँकर गुंतवणूकदार म्हणजे मोठ्या कंपन्या इत्यादी) शेअर्स विकले जातात.
– त्यानंतर सार्वजनिक आयपीओ खुला होतो, ज्यामध्ये किरकोळ, एचएनआय इत्यादी गुंतवणूकदार अर्ज करतात.
– सबस्क्रीप्शन घेतल्यानंतर कंपनी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप करते आणि कंपनी निश्चित तारखेला लिस्टिंग करते.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)