इराण-इस्त्रायल युद्धाचे बाजारात पडसाद, 'या' शेअर्समध्ये विक्रीचा दबाव, तर सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला (फोटो सौजन्य-X)
Share Market Updat In Marathi : अमेरिकेने इराणमधील तीन प्रमुख अणुस्थळांवर बॉम्बहल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच (23 जून) सोमवारी व्यापारात सेन्सेक्स आणि निफ्टी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाल्याचे पाहायलाम मिळाले. सुरुवातीच्या व्यापारात बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ७०५.६५ अंकांनी घसरून ८१,७०२.५२ वर बंद झाला. ५० शेअर्सचा एनएसईचा निफ्टी १८२.८५ अंकांनी घसरून २४,९२९.५५ वर बंद झाला. अमेरिकेने इराणमधील तीन प्रमुख अणुस्थळांवर – फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान – बॉम्बहल्ला केला आणि त्यामुळे स्वतःला इस्रायल-इराण संघर्षात सामील केले. एकंदरित याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.
जिओजित इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्हीके विजयकुमार म्हणाले, “इराणच्या तीन अणु सुविधांवर अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्याने पश्चिम आशियातील संकट आणखी वाढले असले तरी, त्याचा बाजारावर होणारा परिणाम मर्यादित असण्याची शक्यता आहे.
सेन्सेक्सच्या ३० कंपन्यांमध्ये इन्फोसिस, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड आणि एटरनल हे सर्वात मागे पडले. एक्सचेंज डेटानुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) शुक्रवारी ७,९४०.७० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई २२५ निर्देशांक आणि हाँगकाँगचा हँग सेंग लाल रंगात व्यवहार करत होते. तर शांघायचा एसएसई कंपोझिट निर्देशांक किंचित हिरव्या रंगात होता. शुक्रवारी अमेरिकन बाजार बहुतेक कमी बंद झाले. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड १.६९ टक्क्यांनी वाढून ७८.३१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला.
जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात रुपया १७ पैशांनी घसरून ८६.७२ वर आला. फॉरेक्स व्यापाऱ्यांच्या मते, डॉलरमधील मजबूती आणि कमकुवत देशांतर्गत इक्विटी बाजारांमुळे स्थानिक युनिटवर आणखी दबाव निर्माण झाला. आंतरबँक परकीय चलनात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८६.७५ वर उघडला आणि नंतर ८६.७२ वर पोहोचला, जो त्याच्या मागील बंदपेक्षा १७ पैशांनी कमी आहे. शुक्रवारी, स्थानिक युनिटने तीन दिवसांची घसरण मोडली आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १८ पैशांनी वाढून ८६.५५ वर बंद झाला.