अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केट सपाट; गुंतवणूकदारांची निराशा
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार चांगलाच उतरणीला लागला होता. मात्र, आता त्यात काहीशी सुधारणा होत आहे. आज (2 डिसेंबर) शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी वधारून बंद झाला आहे. मात्र, दिवसभराच्या व्यवहारात प्रचंड चढ-उतार दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरून झाली. मात्र, अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स दिवसाच्या निच्चांकी स्तरावरून 1,000 अंकांनी उसळी मारून बंद झाला आहे. तर निफ्टी देखील 24,274 पर्यंत वाढला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ब्रॉड मार्केटमध्येही चांगली वाढ झाली आहे.
फार्मा, रियल्टी, ऑटो शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
आज (ता.2) मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) मिडकॅप निर्देशांक 1.05 टक्क्यांनी व स्मॉलकॅप निर्देशांक 0.84 टक्क्यांनी वाढून बंद झाला आहे. एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकही वधारले आहे. फार्मा, रियल्टी आणि ऑटो शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 445.29 अंकांनी वाढून, 80,248.08 वर बंद झाला आहे. तर निफ्टी 142.90 अंकांनी वधारून 24,274.00 वर बंद झाला आहे.
(फोटो सौजन्य – istock)
ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांची उसळी; खरेदीसाठी तुटून पडलेत गुंतवणूकदार!
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.04 लाख कोटींची वाढ
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज (ता.2) रोजी वाढून 449.72 लाख कोटी रुपये झाले, जे मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी 446.68 लाख कोटी रुपये होते. सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.04 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.04 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेवानिवृत्ती नियोजन सुरू करण्याची हीच सर्वोत्तम वेळ; एचडीएफसी लाइफच्या नवीन मोहिमेचे अनावरण
कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले
मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील 30 पैकी 21 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.93 टक्के वाढ झाली आहे. यानंतर जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा आणि टायटनचे शेअर्स 1.73 ते 2.47 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले आहे. उर्वरित सेन्सेक्सचे 9 शेअर्स समभाग आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये एनटीपीसीचे शेअर 1.55 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले आहे. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स 0.49 टक्क्यांनी ते 0.67 टक्क्यांनी घसरले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)