भारतीय सेमीकंडक्टर स्वप्नाला इंटेलची साथ! टाटासोबत केली मोठी भागीदारी (photo-social media)
Tata Group: अमेरिकन चिप उत्पादक इंटेलने स्थानिक बाजारपेठेसाठी भारतात सेमीकंडक्टर्सचे उत्पादन आणि असेंबल करण्यासाठी टाटा समूहासोबत करार केला आहे. या करारामुळे एआय पीसी क्रांतीला मोठा हातभार लागणार आहे. भारताला टॉप-5 पीसी बाजार बनवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. या करारमुळे ‘मेक इन इंडिया’ला मोठी चालना मिळणार आहे. भारतात सेमीकंडक्टर निर्मितीला नवी गती मिळणार आहे.
टाटा समूहाने सोमवारी याची घोषणा केली. या करारांतर्गत, इंटेल आणि टाटा संयुक्तपणे भारतातील ग्राहक आणि व्यावसायिक बाजारपेठांसाठी विशेषतः डिझाइन केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पीसी सोल्यूशन्सच्या विकासाचा आणि जलद विस्ताराचा शोध घेतील. २०३० पर्यंत भारत जगातील शीर्ष पाच बाजारपेठांपैकी एक होण्याचा अंदाज आहे.
टाटा समूहाच्या निवेदनात म्हटले आहे की, इंटेल आणि टाटा समूहाचे असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या आगामी कारखाने आणि ओएसएटी (आउटसोर्स्ट सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट) सुविधांमध्ये भारतातील स्थानिक बाजारपेठेसाठी इंटेल उत्पादने तयार आणि पॅकेज करण्याची शक्यता शोधण्याचा तसेच भारतातील प्रगत पॅकेजिंगच्या क्षेत्रात सहकार्य करण्याचा मानस ठेवतात.
टाटा समूह गुजरातमधील धोलेरा येथे एक चिप उत्पादन प्रकल्प आणि आसाममध्ये एक सेमीकंडक्टर असेंब्ली अँड पैकेजिंग प्रकल्प उभारत आहे, ज्याची एकूण गुंतवणूक अंदाजे १.१८ लाख कोटी आहे. इंटेल कॉपॅर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लिप-बू टॅन म्हणाले, “भारतात पीसीची वाढती मागणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा जलद अवलंब यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या संगणक बाजारपेठांपैकी एकामध्ये टाटासोबत सहयोग करण्याची ही एक उत्तम संधी आहे असे आम्हाला वाटते.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर अचानक कोसळले, चांदीची किंमत झपाट्याने वाढली! जाणून घ्या सविस्तर
टाटाच्या सेमीकंडक्टर प्रकल्पांना जेव्हा केंद्र सरकारने मंजुरी दिली, तेव्हा टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. जी मोठी वाढ दिसून आली ती काही दिवसांत सुमारे २१% पर्यंत गेली होती. हा परिणाम मुख्यतः बाजारातील सकारात्मक भावनेमुळे झाला असून कंपनी डिझाइन आणि तंत्रज्ञान सेवांमध्ये आघाडीवर आहे आणि सेमीकंडक्टर डिझाइन व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये सेवा पुरवते. टाटाच्या सेमीकंडक्टर उद्योगाच्या वाढीचा टाटा एलक्सीला दीर्घकालीन फायदा होऊ शकतो.






