Tetra Pak India company's innovative initiative in DrinkTech India 2025 (photo-social media)
Tetra Pak India : ड्रिंकटेक इंडिया 2025 मध्ये प्रख्यात फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग सोल्यूशन्स कंपनी Tetra Pak भारतातील बिव्हरेज निर्मात्यांना त्यांच्या कामकाजाचा एकूण खर्च कमी करण्यास, उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दिशेने पुढे जाण्यास सक्षम करत आहे.
या प्रदर्शनादरम्यान Tetra Pak ने उपक्रम, तंत्रज्ञान आणि उपाय सादर केले जे भारतीय बिव्हरेज उद्योगासाठी आणि पर्यावरणपूरक गोष्टींसाठी महत्वाचे आहे. त्यात स्थानिक उत्पादन, नवकल्पना, कमी ऊर्जेचा वापर, आणि नवनवीन पॅकेजिंग स्वरूप यांचा समावेश आहे. Tetra Pak च्या तंत्रज्ञानामुळे उत्पादकांना उत्पादनाच्या सर्व टप्प्यांमध्ये याचा फायदा होऊ शकतो. वेळ आणि जलद काम करण्यासाठी हे तंत्र वापरले तर सोईस्कर होऊ शकते. यामुळे संसाधनांचा वापर कमी, आणि उत्पन्नाची गती वाढवणे हे त्यातील मुख्य मुद्दे आहेत.
शुगर सायरपसाठी मेड-इन-इंडिया हॉरिझॉन्टल फिल्टर त्यांनी सादर केला ज्यामुळे फिल्टर प्रक्रिया सुधारली आणि अस्थिर घटकांचा अपव्यय कमी झाला. तसेच त्यांनी टेट्रा पॅक® E3/स्पीड हायपर नावाने जगातील सर्वात वेगवान असेप्टिक कार्टन फिलिंग मशीन प्रदर्शित केले आहे, ज्याद्वारे प्रति तास अंदाजे 40,000 पॅक तयार होऊ शकतात, हे उत्पादन गती आणि खर्च कमी करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल असल्याचे म्हंटले जात आहे.
Tetra Pak विविध प्रकारच्या बिव्हरेज कॉन्सेप्टसाठी उपाय सुचवत आहे. म्हणजेच, भारतातील ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार, अर्थात कमी साखर असलेले पेयांची वाढती मागणी, इलेक्ट्रोलाइट्स घटकांनी समृद्ध पेये, प्रथिनेयुक्त दुग्ध किंवा वनस्पती-आधारित पेये, या सगळ्या नव्या कल्पना या उद्योगांना नव्याने उभारी देतील ज्याने नवीन बाजारपेठा गाठायला मदत होईल.
हेही वाचा : Russian Oil Trade India Update: ट्रम्पच्या निर्बंधांमुळे भारताचा मोठा निर्णय! रशियाकडून भारताने…
Tetra Pak ने भारतातील पहिले असे बिव्हरेज कार्टन सादर केले आहेत ज्यात सुमारे 5% प्रमाणात प्रमाणित रिसायकल केलेले पॉलिमर वापरले गेले आहेत. यामुळे प्रदूषणाला आळा बसण्यासाठी महत्वाचे पाऊल ठरू शकते. व्यवसाय क्षेत्रात जे नविन विचार घेऊन येत आहे त्यांच्यासाठी टेट्रा पॅक कंपनी नवीन सोपे तंत्रज्ञान आणि प्रक्रियेचा संपूर्ण पुरवठा यांचा विचार करून त्यांच्या कामात सुलभता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. Tetra Pak चे स्थानिक उत्पादन अर्थात मेड़-इन-इंडिया या तंत्रज्ञान आणि पॅकेजिंग हे भारतीय बाजाराच्या गरजा, खर्च यांवर रचलेले आहेत, ज्यामुळे स्थानिक कंपन्या याचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेऊ शकतात.
Tetra Pak ने ड्रिंकटेक इंडिया 2025 मध्ये सादर केलेले उपाय हे भारतीय बिव्हरेज उद्योगासाठी उपाय केवळ खर्च कमी करण्यावर नाही, तर गुणवत्तेवरही लक्ष देणार आहेत. बिव्हरेज निर्मात्यांना आता पारंपरिक उत्पादन आणि पॅकेजिंग पद्धतींना आव्हान देऊन नवीन तंत्रज्ञान स्वीकारावे लागणार आहे, ज्यामुळे त्यांचा फायदा वाढेल.






