फोटो सौजन्य - Social Media
‘थिओब्रोमा’ भारतातील प्रसिद्ध केक ब्रँड आहे. हा बेकारी ब्रँडसाठी बाजारात फार मागणी आहे. विशेष म्हणजे मोठ्या मोठ्या मॉलमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये हा ब्रँड हमखास सापडतो. या ब्रँडची मालक कैनाझ मेसमन हरचंद्राई आहे. तिने तिच्या बहिणीसोबत या ब्रँडला सुरुवात केली होती. या ब्रँडचे बाजारात अनेक चाहते आहेत. २००४ साली या ब्रॅण्डची सुरुवात करण्यात आली होती. बहीण टीना मेसमानने कैनाझला फार साथ दिली. दोघांच्या कष्टाने आज हा बेकिंग ब्रँड साडे ३ हजार कोटींची कंपनी बनली आहे. या कंपनीची सुरुवातही जरा हटके आहे. आपल्या आवडीला जपण्याच्या जिद्दीमध्ये इतका मोठा कारोबार उभा केला गेला आहे. या बेकारी ब्रँडचे देशभरात २२५ आउटलेट आहेत.
हे देखील वाचा : Income Tax भरण्यात 39 टक्के योगदानासह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर! इतर राज्यांची नेमकी स्थिती काय?
‘थिओब्रोमा’ चा प्रवास २००४ सालापासून सुरु झाला. या वर्षांपासून ‘थिओब्रोमा’ ब्रँड यासह प्राप्त करत आहे. २००४ साली, पाठीत झालेल्या दुखापतीमुळे कैनाझ मेसमनला नोकरी सोडावी लागली होती. कैनाझ मेसमन पेस्ट्री शेफ होती. पाककलेत तिला विशेष रस होता. अनेकदा ती तिच्या आईला वेगवेगळ्या डिश बनवण्यात मदत करत असते. १६ वर्षाची असताना कैनाझ मेसमन फ्रांसमध्ये एका टूरवर गेली होती. 2004 मध्ये थिओब्रोमा पेस्ट्री शॉप सुरू करण्यापूर्वी, कैनाझ मेसमनने ओबेरॉय उदयविलास येथे पेस्ट्री शेफ म्हणून काम केले.
वडिलांकडून १.५ कोटी रुपये उसने घेतले आणि ब्रँड उभारण्यास सुरुवात केली. कैनाझ मेसमनमी सुरुवात पूर्णपणे शून्यापासून केली नव्हती कारण तिला या क्षेत्रामध्ये अनुभव होता. अशा प्रकारे तिने तिच्या बहिणीच्या साथीने ‘थिओब्रोमा’ हा बेकिंग ब्रँड बनवण्यास सुरुवात केली. या संख्या बहिणीचा या बिझनेसला सुरवात २००२४ साली दसऱ्याच्या दिवशी झाली. सध्या या कंपनीचा एकूण मूल्यांक साडे ३००० कोटी आहे.
हे देखील वाचा : डेटॉल बनेगा स्वस्थ इंडिया: जागतिक हँडवॉशिंग दिवस 2024 साजरा, AI समर्थित चॅटबोट केला सादर
‘थिओब्रोमा’ नावामागचा इतिहास
‘थिओब्रोमा’ हे ग्रीक नाव आहे. ‘थिओब्रोमा’ या नावातीलम ‘थिओस’ या शब्दाचा अर्थ देव आहे तर ‘ब्रोमा’ या शब्दाचा अर्थ भोजन आहे. एकंदरीत, ‘थिओब्रोमा’ या शब्दाचा अर्थ ‘देवतांचे भोजन’ असे आहे.






