कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी होणार लागू? (Photo Credit - X)
संसदेत मंत्र्यांनी काय सांगितले?
वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, ८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये सरकारने आयोगाच्या अटी व शर्तींना मंजुरी दिली असून, आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. या अहवालात वेतन, भत्ते आणि पेन्शनच्या पुनर्रचनेची शिफारस केली जाईल.
हे देखील वाचा: समान कामासाठी समान वेतन होणार लागू; मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष पक्षपात का?
वेतन आयोग लागू होण्याचे ‘तीन’ महत्त्वाचे संकेत
तज्ज्ञांच्या मते, ८ वा वेतन आयोग लवकरच लागू होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत:
१. १० वर्षांचे अंतर: ५ वा, ६ वा आणि ७ वा वेतन आयोग दर १० वर्षांनी (१९९६, २००६, २०१६) लागू झाला आहे. त्या हिशोबाने २०२६ मध्ये नवीन आयोग येणे अपेक्षित आहे.
२. महागाई भत्ता (DA): जेव्हा डीए ५०% च्या पुढे जातो, तेव्हा नवीन वेतन आयोगाची मागणी तीव्र होते. सध्या डीए ५८% वर पोहोचला आहे.
३. सरकारची मंजुरी: जानेवारी २०२५ मध्ये कॅबिनेटने या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी दिली होती, तर ३ नोव्हेंबर २०२५ रोजी यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कधीपासून मिळणार वाढीव पगार?
जरी ८ व्या वेतन आयोगाची ‘प्रभावी तारीख’ १ जानेवारी २०२६ असू शकते, तरी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष वाढीव पगार जमा होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. आयोगाला १८ महिने दिले आहेत, त्यानंतर कॅबिनेट मंजुरी आणि विभागांची प्रक्रिया पार पडेल. ७ व्या वेतन आयोगाचा अनुभव पाहता, कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रत्यक्ष वाढीव पगार आणि थकबाकी (Arrears) मिळण्याची शक्यता अधिक आहे.






