सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (फोटो- सोशल मीडिया)
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला
सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
मुख्यमंत्री फडणवीस राज्यपालांना पत्र पाठवणार
मुंबई: राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज विधीमंडळात पक्षाची अहत्वाची बैठक पार पडली. त्यात सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. तर सुनेत्रा पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडणार आहे.
दरम्यान सुनेत्रा पवार यांना पक्षाचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. व्हीप काढण्याचे अधिकार देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे राहणार आहे. तसेच राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत. शपथविधी झाल्यावर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला जाणार असल्याचे समजते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दशक्रिया पार पडेपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीमध्येच राहणार असल्याचे समोर आले आहे.
Sunetra Pawar स्वीकारणार उपमुख्यमंत्रीपद
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारली असून, आज सायंकाळी ५ वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे.
केवळ उपमुख्यमंत्रीपदच नाही, तर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य सरकारमधील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी उत्पादन शुल्क आणि क्रीडा ही दोन मंत्रालये देखील सोपवली जाणार आहेत. सत्तेचे संतुलन राखण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) पकड मजबूत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीतील समीकरणे बदलणार? स्थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता
राजकीय वर्तुळातून दुसरी मोठी बातमी म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः राज्याच्या अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, आर्थिक धोरणांवर थेट नियंत्रण असावे आणि बजेटची तयारी प्रभावीपणे व्हावी, या हेतूने फडणवीसांनी ही महत्त्वाची जबाबदारी घेण्याचे ठरवले आहे.






