संग्रहित फोटो
भारतातील शेतकऱ्यांचं लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना सध्या 6000 रुपये मिळतात, ती रक्कम वाढणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये विभागून म्हणजेच प्रत्येक हप्त्यावेळी 2000 रुपये दिले जातात. सध्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग केली जाते. सध्या शेतीचा खर्च वाढल्यामुळे पीएम किसान योजनेची रक्कम वाढेल का? ते पाहावे लागेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली होती. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना 21 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवली तर शेतकऱ्यांना वाढत्या बी- बियाणे, खते, कीटकानशक, डिझेल, वीज, सिंचन यातील दरवाढीमुळं जो ताण पडतोय त्यातून थोडासा दिलासा मिळू शकतो. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्यास ग्रामीण भागात मागणी वाढू शकते. शेतकऱ्यांकडे खर्चासाठी पैसे अधिक असतील तेव्हा ग्रामीण भागातील बाजारात उलाढाल वाढेल. आता पीएम सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान शेतकऱ्यांना जरी पीएम किसानच्या हप्त्याची प्रतीक्षा असली तरी केंद्र सरकारकडून अद्याप रक्कम वाढी संदर्भात अधिकृत संकेत देण्यात आलेले नाहीत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
हे सुद्धा वाचा : कंटाळवाणा नव्हे तर रेल्वेचा प्रवास सुखकर! Vande Bharat सुसाट, तब्बल ‘इतके’ कोटी…
सोन्याची किंमत होणार स्वस्त?
उद्या रविवार, १ फेब्रवारी २०२६ रोजी देशात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते हे नवीन बजेट सादर केले जाणार असून याचा रोजच्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. नव्या वर्षात तुम्हीही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नवे बजेट तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरु शकते. सोने, चांदी, प्लॅटिनम आणि रंगीत रत्ने यांसारख्या कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी सर्वात प्रमुख आहे. आयात शुल्क कमी केल्याने दागिन्यांच्या किमती कमी होऊ शकतात आणि निर्यात वाढू शकते. सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे उद्योगालाच नाही तर ग्राहकांनाही सोनं खरेदी करणं सोईचं ठरेल.






