ट्रम्प इस्रायलच्या मुठीत? Jeffrey Epstein प्रकरणावरुन अमेरिकेत वाद; नेतन्याहूंच्या हातात रिमोट कंट्रोल?
Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो
अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकतेच एपस्टिन प्रकरणाशी संबंधित अंदाजे १८०० फोटो, २००० हून अधिक व्हिडिओ खुले केले आहेत. या फाइलींमध्ये ट्रम्पविरोधी अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहे.याच वेळी इस्रायल आणि मोसाद संबंधी देखील नवे दावे यामध्ये करण्यात आले आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
परंतु ही सर्व कागपत्रे, फोटो व्हिडिओ खुली करताना अमेरिकेच्या न्याय विभागाने स्पष्ट केले आहे की, या फाइल्समध्ये काही चुकीचे आणि सनसनाटी दावे देखील आहेत. तसेच ट्रम्पशी संबंधित काही प्रकरणे गोपनीयतेच्या कारणास्तवर रेडॅक्ट करण्यात आली आहेत. अमेरिकेचे डेप्युटी ॲटर्नी जनरल आणि ट्रम्पचे मित्र टॉड ब्लँच यांनी सांगितले की, पुनरावलोकनच्या प्रक्रियेमध्ये ट्रम्प प्रशासानाचा कोणताही सहभाग नव्हता.
दरम्यान या दस्ताऐवजांमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, दिग्दर्शक वुडी ॲलन, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि अनेक राजरण्यांची, शिक्षणतज्ज्ञांची नावे आहेत. यामध्ये बिल गेट्सचा विवाहबाह्य संबंध असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र बिल गेट्स फाउंडेशन हा दावा नाकारला आहे.
स्टीव्ह टिश आणि इतर काही महिलांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय ट्रम्प यांचे जावाई जेरेड कुशनरचाही या प्ररकणाशी संबंध जोडला जात आहे. ट्रम्पचे जावई जेरेडे कुशनरचाही व्यावसायिक आणि राजकीय प्रभावाविषयी इस्रायलीची गुप्तचर संस्था मोसादशी संबंध जोडला जात आहे. सध्या या प्रकरणाने जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.
जेफ्रीन एपस्टीन हा जगातील श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांसाठी लैंगिक तस्करीचे जाळे चालवणारा व्यक्ती म्हणून ओळखला जातो. त्यांचा २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात मृत्यू झाला आहे. त्याने आत्महत्या केल्याचा दावा केला जातो. परंतु आजही त्याच्या मृत्यूचे गुढ कायम आहे.
हे प्रकरण ट्रम्प-मस्त वादात मोठ्या प्रमाणात आले होते. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्रम्पचा जेफ्रीशी संबंध असल्याचा आरोप केला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान आता या प्रकरणाशी एलॉन मस्क यांचाही संबंध असल्याचे उघड झाले आहे.






