१ जूनपासून ‘हे’ महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम, जाणून घ्या (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
New Rules from 1 June Marathi News: पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून (१ जून २०२५) अनेक मोठे बदल लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर आणि दैनंदिन सेवांवर होईल. यामध्ये बँक खाती, एटीएम व्यवहारांसह अनेक नियमांचा समावेश आहे. या बदलांनंतर, सामान्य लोकांना त्यांच्या व्यवहार आणि सेवांबाबत काही नवीन नियमांचे पालन करावे लागेल. चला तर जाणून घेऊया 1 जूनपासून लागू होणाऱ्या मुख्य बदलांची संपूर्ण माहिती.
१ जूनपासून EPFO, LPG, क्रेडिट कार्ड व्यवहार, ATM ट्रांजॅक्शन, आणि FD अशा अनेक सेवांमध्ये नवे नियम लागू होणार आहेत. या नियमांमुळे तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागू शकतात, तर काही सुविधांमध्ये सुट मिळण्याची शक्यता आहे. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते, म्हणून प्रत्येक खातेदार व ग्राहकांनी ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सरकार EPFO चं नवीन व्हर्जन 3.0 लाँच करण्याच्या तयारीत आहे. या अपग्रेडमुळे पीएफ रक्कम काढणे, माहिती अपडेट करणे आणि क्लेम प्रक्रियाही अधिक सुलभ होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एटीएमसारख्या कार्डच्या माध्यमातूनही पीएफ रक्कम काढणे शक्य होणार आहे. हे डिजिटल अपग्रेड कर्मचाऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल.
१ जूनपासून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी नवे नियम लागू होतील. ऑटो-डेबिट फेल झाल्यास 2 टक्के दंड आकारला जाईल. याशिवाय युटिलिटी बिल पेमेंट, पेट्रोल-डिझेल खरेदी यावर अतिरिक्त चार्ज लागू होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठीही जास्तीचे शुल्क लागू होणार आहे. तसेच, रिवॉर्ड पॉइंट्सच्या प्रणालीत कपात केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांनी आपल्या क्रेडिट कार्डचा वापर अधिक जबाबदारीने करावा लागेल.
ATM व्यवहारांबाबतही नवे नियम येणार आहेत. ATM मधून रक्कम काढण्यासाठी लागणाऱ्या शुल्कात वाढ होऊ शकते. म्हणजेच ठरलेल्या मोफत व्यवहारांनंतर प्रत्येक ट्रांजॅक्शनसाठी अधिक रक्कम भरावी लागणार आहे.
त्याचबरोबर, एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीतही 1 जूनपासून बदल होण्याची शक्यता आहे. हे दर दर महिन्याच्या 1 तारखेला अपडेट होतात. या महिन्यातही दर कमी किंवा वाढ होऊ शकतो आणि याचा थेट परिणाम घरगुती खर्चावर होणार आहे.
सध्याच्या घडीला बहुतांश बँका FD साठी 6.5% ते 7.5% दरम्यान व्याज देत आहेत. मात्र बँकिंग तज्ज्ञांच्या मते, जूनपासून हे व्याजदर काही अंशी कमी होऊ शकतात. त्यामुळे ज्या ग्राहकांनी एफडीसाठी योजना आखली आहे, त्यांनी याकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि योग्य वेळी गुंतवणूक करावी.
1 जून 2025 पासून लागू होणारे हे नवे नियम तुमच्या दैनंदिन जीवनावर निश्चितच प्रभाव टाकणार आहेत. आर्थिक नियोजन करताना या बदलांचा विचार करणे आवश्यक आहे. मग ते EPFO चा अपग्रेड असो किंवा क्रेडिट कार्ड शुल्कात बदल – प्रत्येक गोष्ट तुमच्या खर्चाच्या पद्धतीवर परिणाम करू शकते. त्यामुळे या सर्व अपडेट्सबाबत सजग राहा आणि आपल्या आर्थिक सुरक्षिततेला अधिक मजबूत करा.