स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशन्स आणून ‘वी बिझनेस’ने IoT पोर्टफोलिओमध्ये केली भर (Photo Credit - X)
CGD क्षेत्राचे वाढते महत्त्व
पेट्रोलियम ॲन्ड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या (PNGRB) अंदाजानुसार, CGD क्षेत्र या दशकाच्या अखेरीस नैसर्गिक वायूचे भारतातील सर्वात मोठे ग्राहक बनेल आणि एकूण व्हॉल्युमच्या जवळपास एक तृतीयांश हिस्सा या क्षेत्राकडे जाईल. मागणी वाढत असल्याने CGD कंपन्यांसाठी स्मार्ट गॅस मीटरिंग महत्त्वाचे ठरत आहे. गळती (leakage), चोरी, मॅन्युअल बिलिंगमधील चुका यामुळे होणारा ‘लॉस्ट ॲन्ड अनअकाउंटेड गॅस’ कमी करण्यासाठी हे सोल्युशन्स खूप उपयुक्त ठरणार आहेत.
तंत्रज्ञान आणि लाभ
वी बिझनेसच्या स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशनमध्ये नॅरोबँड-आयओटी (NB-IoT) तंत्रज्ञानाचा आणि मोठ्या कम्युनिकेशन्स नेटवर्क्सचा वापर केला जातो. यामुळे CGD ऑपरेटर्सना संचालनात्मक कार्यक्षमतेत (Operational Efficiency) वाढ करता येते आणि बिलिंगच्या अचूकतेमध्ये (Billing Accuracy) सुधारणा करण्यास मदत होते.
वी बिझनेसची बांधिलकी
वीचे चीफ एंटरप्राइज बिझनेस ऑफिसर श्री अरविंद नेवाटिया म्हणाले, “सेवासुविधा पुरवणाऱ्यांच्या संचालनाला डिजिटल मीटरिंग नवा आकार देत आहे आणि स्मार्ट गॅस मीटरिंग हे भारतातील सेवासुविधांच्या परिवर्तनाचे नवे क्षितिज आहे. आम्ही CGD ऑपरेटर्सना त्यांच्या नेटवर्क्सचे आधुनिकीकरण करण्यात, अकार्यक्षमता कमी करण्यात आणि रेव्हेन्यू अश्युरन्स वाढवून ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा प्रदान करण्यात मदत करण्यासाठी बांधील आहोत. भविष्यासाठी सज्ज सोल्युशन्स आणून भारताच्या युटिलिटी क्षेत्राला सक्षम बनवण्याचे काम वी बिझनेस पुढेही सुरु ठेवेल.”
पोर्टफोलिओच्या या विस्तारामुळे महत्त्वपूर्ण उपयुक्त मूलभूत सेवासुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी वी बिझनेसची बांधिलकी अधिक मजबूत झाली आहे.






