कर्ज हे केवळ एक उधारी नसून अर्थव्यवस्थेसाठी एक दुधारी तलवार आहे. ज्याप्रमाणे एखादा सामान्य नागरिक घरासाठी, शेतीसाठी, शिक्षणासाठी कर्ज घेतो, तसेच जगभरातील अनेक देशही पायाभूत सुविधा, जागतिक विकासाच्या कामांसाठी निधी घेतो. अलीकडच्या काळात तर कर्ज एक ऑक्सिजन बनत चालले असून जो देश जितका मोठा तितके त्याच्यावर कर्ज आहे. हे फेडण्यासाठी लोकांना पृथ्वीवरील कागदही अपुरे पडतील इतके चलन देशांनी घेतली आहे. यंदा २०२६ च्या जागतिक आकडेवारीनुसार टॉप १० मध्ये भारताचाही समावेश झाला आहे, तर अव्वल स्थानी जगातील सर्वात बलाढ्य देश आहे. (फोटो सौजन्य : iStock)
World Debt

सध्याच्या घडीला जगभरातील अनेक देश कर्जबाजारी झाले आहे. अनेक देशांवर कोट्यावधी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. वाढती जनसंख्या, सामाजिक योजनांसाठी लागणारा निधा, युद्धांवरील खर्च या कारणांमुळे अनेक देशांच्या अर्थव्यस्थेत तूट निर्माण झाली आहे. आज आपण कोणत्या देशांवर किती कर्ज आहे, आणि भारत यामध्ये कोणत्या स्थानी आहे जाणून घेऊयात

जानेवारी २०२६ च्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ च्या डेटानुसार, सर्वात प्रगतीशील आणि शक्तीशाली मानला जाणारा देश अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. डेटानुसार, अमेरिकेवर साधारण 38.3 ट्रिलियन कर्ज असून यामध्ये सैन्यावर, काही महत्वाकांक्षी योजनांसाठी कर्ज घेण्याची वेळ ट्रम्प प्रशासनावर आली आहे.

जानेवारी २०२६ च्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ च्या डेटानुसार, कर्जाच्या बाबतीत चीन हा दुसऱ्या स्थानावर आहे. पायाभूत सुविधा आणि आर्थिक स्थिती सुधारण्याच्या निर्णयानंतर चीनवर 18.7 ट्रिलियन डॉलरचे कर्ज घेण्याची वेळ आली आहे

तर जानेवारी 2026 च्या आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार, 9.8 ट्रिलियन डॉलर सरकारी सर्जासह जपान तिसऱ्या स्थानावर आहे

या कर्जबाजारी देशांच्या यादीत ब्रिटनचाही समावेश आहे. जानेवारी 2026 च्या आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार, ब्रिटनवर 4.1 ट्रिलियन डॉलर सरकारी कर्ज असून तो चौथ्या स्थानावर आहे

तर २०२६-२५च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, फ्रान्स पाचव्या स्थानावर असून 3.9 ट्रिलियन डॉलर कर्ज तर, इटली या यादीत सातव्या स्थानावार 3.5 ट्रिलियन डॉरल सरकारी कर्जासह आहे

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणदे यंदा कर्बजारी देशांमध्ये भारताचाही सामवेश आहे. भारतावर ३.८ ट्रिलियनचे कर्ज असून आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारत हा सहाव्या स्थानी आहे.






