(फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
Vodafone Idea ची मुळ कंपनी आणि ब्रिटीश टेलिकॉम कंपनी Vodafone Group PLC ने Indus Towers Limited मधील १८ टक्के हिस्सा विकला आहे. म्हणजेच Vodafone Group PLC ने Indus Towers Limited मधील ४८.४७ कोटी शेअर्स विकले आहेत. Indus Towers Limited मधील १८ टक्के हिस्सा विकल्यानंतर Vodafone Group PLC ला १५,३०० कोटी रुपये मिळाले. या मिळालेल्या पैशातून Vodafone Group PLC बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Vodafone Group Plc ने सांगितले आहे की, Indus Towers Limited मधील १८ टक्के हिस्सा १५,३०० कोटी रुपयांमध्ये विकला गेला. या व्यवहारातून मिळालेल्या रक्कमेचा मोठा भाग कंपनी त्यांच्या भारतातील मालमत्तेवर घेतलेल्या थकित बँक कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. या व्यवहारानंतर Vodafone Group Plc चा Indus Towers Ltd मध्ये ३.१ टक्के हिस्सा आहे. या व्यवहारामध्ये Bharti Airtel ने देखील सहभाग घेतला होता. यावेळी Bharti Airtel ने Indus Towers Limited चे सुमारे २.६९ कोटी शेअर्स विकत घेतले आहेत. या व्यवहारानंतर Bharti Airtel चा Indus Towers Limited मधील हिस्सा १ टक्क्यांनी वाढला आहे. या व्यवहाराबाबत Bharti Airtel ने स्टॉक एक्स्चेंजला एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकामध्ये म्हटले आहे की, विशेष समितीच्या मंजुरीनंतर Bharti Airtel ने Indus Towers Limited चे २.६९ कोटी शेअर्स विकत घेतले आहेत.
Vodafone Idea ने Indus Towers Limited मधील १८ टक्के हिस्सा विकला आहे. या व्यवहारातून मिळालेल्या पैशातून Vodafone Group PLC बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणार असल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहारानंतर काल Vodafone Idea च्या शेअर्स मध्ये वाढ झाली होती. Vodafone Idea चा ०.०६ टक्क्यांच्या वाढीसह १६.९२ रुपयांवर बंद झाला. तर Indus Towers Limited चा शेअर २.८८ टक्क्यांच्या घसरणीसह ३३४ रुपयांवर बंद झाला. Bharti Airtel चा शेअर २.४९ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.