Stock Market Today: शेअर बाजारात कशी होणार आठवड्याची सुरुवात? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज
Todays Gold-Silver Price: सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
शुक्रवारी, भारतीय शेअर बाजाराने सलग पाचव्या सत्रात तोटा वाढवला आणि तो तीव्र घसरणीसह संपला. सेन्सेक्स ६०४.७२ अंकांनी किंवा ०.७२% ने घसरून ८३,५७६.२४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १९३.५५ अंकांनी किंवा ०.७५% ने घसरून २५,६८३.३० वर बंद झाला. आजच्या व्यवहारात गुंतणूकदार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, आनंद राठी वेल्थ, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, डीमार्ट, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयआरईडीए, स्पंदना स्फुर्ती, लेमन ट्री हॉटेल्स, अक्झो नोबेल, वेदांत या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांनी गुंतवणूकदारांना पुढील एक ते दोन आठवड्यांसाठी तीन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, जेएसडब्ल्यू एनर्जी यांचा समावेश आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांच्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार टाटा कॅपिटल, आयजीएल आणि ओआयएल हे शेअर्स खरेदी करू शकतात.
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही स्टॉक्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आजसाठी दोन स्टॉक्सची निवडी केली आहे तर आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन स्टॉक सुचवले आहेत. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान तीन स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉक पिकमध्ये अशोक लेलँड, इप्का लॅबोरेटरीज, रिलायन्स इंडस्ट्रीज, सेल, गुजरात पिपावाव पोर्ट, रॅम्को सिमेंट्स, आरती फार्मालॅब्स आणि एशियन पेंट्स यांचा समावेश आहे.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. यामध्ये सीसीएल प्रॉडक्ट्स (इंडिया), केएसबी, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज आणि रॅम्को सिमेंट्स लिमिटेड यांचा समावेश आहे. तसेच बगडिया यांनी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, एनएचपीसी आणि झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस या शेअर्सची शिफारस केली आहे.






