भारतीय संघाचा फलंदाज अभिषेक शर्मा सध्या देशभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये सर्वाधिक टीकेचा सामना करत आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषकात त्याने चार सामन्यांमध्ये १५ धावा केल्या आहेत. हे १५ धावा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या शेवटच्या टी२० सामन्यात आल्या होत्या. त्याने पहिल्या टी२० सामन्यांमध्ये भोपळा फोडलाच नव्हता.
भारतीय संघासाठी कमकुवत दुवा बनलेला दुसरा खेळाडू म्हणजे तिलक वर्मा. तिलक वर्माआतापर्यंत अपेक्षांनुसार खेळू शकला नाही. त्याने पाच डावांमध्ये १०७ धावा केल्या आहेत, सरासरी २१.४० आणि स्ट्राईक रेट ११८.८८ आहे. भारतीय फलंदाजी श्रेणीत तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी आवश्यक कामगीरी तो करताना दिसत नाही आहे. त्यामुळे टीमला हवा तसा सपोर्ट मिळत नाही आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शॉट खेळताना तो ज्या पद्धतीने आउट झाला, त्यावर सुनील गावस्कर यांच्यासारख्या दिग्गजांनीही त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. या विश्वचषकात निष्काळजी शॉट खेळत अभिषेक शर्मालानेही आपले विकेट गमावले आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकात, रिंकू सिंगने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये फक्त 29 बॉल खेळले आणि 24 धावा केल्या आहेत. दमदार फिनिशर असलेल्या रिंकू सिंगने त्याला साजेशी अशी कामगिरी केलेली नाही. रिंकूने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात १४ बॉल ६ धावा, नामिबियाविरुद्ध ६ बॉल १ धाव, पाकिस्तानविरुद्ध ४ बॉल ११ नाबाद आणि नेदरलँड्सविरुद्ध ३ बॉल ६ नाबाद धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने २ बॉल खेळले पण तो धाव न घेता बाद झाला.
रिंकू आतापर्यंत स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. तथापि, तो बॅटने महत्त्वपूर्ण खेळी करू शकलेला नाही. त्याने पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या षटकात शाहीन आफ्रिदीला नक्कीच हरवले. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सुपर ८ सामन्यात रिंकूने आपले खातेही उघडले नाही. हा सामना भारताने अहमदाबादमध्ये गमावला होता.






