• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • 5 Skills Needed To Build A Bright Career By Linkedin

LinkedIn ‘स्किल्स ऑन द राइज २०२६’ अहवाल सादर! उज्‍ज्‍वल करिअर घडवण्‍यासाठी आवश्‍यक असलेली ५ कौशल्‍ये

LinkedInच्या ‘स्किल्स ऑन द राइज २०२६’ अहवालानुसार, करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी एआय, डेटा, सायबरसिक्युरिटी, बिझनेस आणि लीडरशीप ही ५ कौशल्ये महत्त्वाची ठरत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 24, 2026 | 03:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

LinkedInच्या ‘स्किल्स ऑन द राइज २०२६’ अहवालानुसार, बदलत्या रोजगार बाजारात टिकून राहण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी पाच महत्त्वाची कौशल्ये पुढे आली आहेत. यामध्ये एआय अँड ऑटोमेशन, डेटा अँड अॅनालिटिक्स, आयटी अँड सायबरसिक्युरिटी, बिझनेस अँड ग्रोथ आणि पीपल अँड लीडरशीप या कौशल्यांचा समावेश असून, ही कौशल्ये भविष्यातील रोजगारासाठी निर्णायक ठरत आहेत.

IAS-IPS सर्व्हिस प्रेफरन्स कसा निवडावा? विकास दिव्यकीर्ती सरांनी दिला मोलाचा सल्ला; ‘ही’ चूक करू नका!

आजच्या डिजिटल आणि वेगाने बदलणाऱ्या युगात नोकरी मिळवणे आणि टिकवणे हे दोन्ही मोठे आव्हान बनले आहे. भारतामध्ये तब्बल ३८ टक्के नोकरी शोधणाऱ्यांना तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या कौशल्यांच्या गरजांशी जुळवून घेणे कठीण जात असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, ७४ टक्के रिक्रूटर्सना योग्य आणि पात्र उमेदवार शोधणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण वाटत आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित तयारी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

एआय अँड ऑटोमेशन या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, वर्कफ्लो ऑटोमेशन, API इंटीग्रेशन आणि ऑटोएमएल यांसारखी कौशल्ये वेगाने विकसित होत असून, केवळ आयटीपुरती मर्यादित न राहता मार्केटिंग, एचआर आणि सेल्ससारख्या क्षेत्रांमध्येही यांचा वापर वाढत आहे. यामुळे एआयचा वापर आता प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचा बनला आहे.

डेटा अँड अॅनालिटिक्स हे दुसरे महत्त्वाचे क्षेत्र ठरत आहे. डेटा अॅनालिसिस, डेटा स्टोरीटेलिंग, डेटा एथिक्स आणि डेटाबेस मॅनेजमेंट यांसारख्या कौशल्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. कंपन्या आता केवळ डेटा गोळा करण्यावर भर देत नाहीत, तर त्यातून योग्य निर्णय घेण्यासाठी त्याचा प्रभावी वापर करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देत आहेत.

आयटी अँड सायबरसिक्युरिटी क्षेत्र देखील तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर, थ्रेट डिटेक्शन, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि इन्सिडेंट मॅनेजमेंट यांसारखी कौशल्ये संस्थांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक बनली आहेत. डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन प्रणाली वाढत असताना सायबर हल्ल्यांचा धोका वाढला आहे, त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणीही वाढत आहे.

बिझनेस अँड ग्रोथ या क्षेत्रात कंपन्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक कौशल्यांवर भर दिला जात आहे. रिलेशनशिप मॅनेजमेंट, नेगोशिएशन, प्रोसेस ऑप्टिमायझेशन आणि व्हिज्युअल स्टोरीटेलिंग यांसारखी कौशल्ये व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरत आहेत. कार्यक्षमतेत वाढ आणि ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करणे हे या कौशल्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

तर पीपल अँड लीडरशीप कौशल्ये कर्मचाऱ्यांना वेगळेपण देतात. टीम मॅनेजमेंट, कोलॅबोरेशन, स्टेकहोल्डर मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारखी कौशल्ये संस्थेमध्ये प्रभावी कामगिरीसाठी आवश्यक ठरत आहेत. आजच्या काळात केवळ तांत्रिक कौशल्ये पुरेशी नसून, लोकांशी संवाद साधण्याची आणि टीममध्ये काम करण्याची क्षमता देखील महत्त्वाची झाली आहे.

पालकांनो लक्ष द्या! कमी उत्पन्न असलेल्यांनाही आता मुलांना मोठ्या शाळेत शिकवता येणार; काय आहे EWS कोटा?

Nirajita Banerjee यांनी सांगितले की, २०२६ मध्ये फक्त एका क्षेत्रात तज्ज्ञ असणे पुरेसे नाही. विविध कौशल्यांचा संगम, सतत शिकण्याची वृत्ती आणि बदलांना स्वीकारण्याची तयारी हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. उमेदवारांनी स्वतःची कौशल्ये ओळखून त्यामध्ये सातत्याने सुधारणा करणे आवश्यक आहे.

याशिवाय, प्रोफेशनल्सना नवीन कौशल्ये शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी लिंक्डइनने ३१ मार्च २०२६ पर्यंत काही लर्निंग कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये एआय, डेटा अॅनालिटिक्स आणि लीडरशीपसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. एकूणच, भविष्यातील करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ पदवी किंवा पारंपरिक ज्ञान पुरेसे राहणार नाही. त्यासाठी अद्ययावत कौशल्ये, व्यावहारिक अनुभव आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तरुणांनी आजपासूनच या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करून स्वतःला भविष्यासाठी तयार करणे गरजेचे आहे.

Web Title: 5 skills needed to build a bright career by linkedin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • linkedin

ताज्या बातम्या

पुढे वाचा
LinkedIn ‘स्किल्स ऑन द राइज २०२६’ अहवाल सादर! उज्‍ज्‍वल करिअर घडवण्‍यासाठी आवश्‍यक असलेली ५ कौशल्‍ये

LinkedIn ‘स्किल्स ऑन द राइज २०२६’ अहवाल सादर! उज्‍ज्‍वल करिअर घडवण्‍यासाठी आवश्‍यक असलेली ५ कौशल्‍ये

Feb 24, 2026 | 03:19 PM
Pune Police: पुणे पोलिसांना ‘लोकसेवा हक्क’ कायद्याचे धडे! ४५ पोलीस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण

Pune Police: पुणे पोलिसांना ‘लोकसेवा हक्क’ कायद्याचे धडे! ४५ पोलीस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण

Feb 24, 2026 | 03:15 PM
MWC 2026: Honor चा मोठा धमाका! टेक ईव्हेंटमध्ये दाखवणार पहिल्या ह्यूमनॉइड रोबोटची झलक, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

MWC 2026: Honor चा मोठा धमाका! टेक ईव्हेंटमध्ये दाखवणार पहिल्या ह्यूमनॉइड रोबोटची झलक, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

Feb 24, 2026 | 03:15 PM
हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

Feb 24, 2026 | 03:10 PM
आरोग्य अभियान कर्मचारी अद्यापही वेतनापासून दूरच; मागील तीन महिन्यांपासून…

आरोग्य अभियान कर्मचारी अद्यापही वेतनापासून दूरच; मागील तीन महिन्यांपासून…

Feb 24, 2026 | 03:08 PM
‘त्यांना फक्त तरुण अभिनेत्यांसोबत काम करायचं असतं…’, अनिल कपूर यांचं बॉलीवूड अभिनेत्रींबाबत मोठं वक्तव्य

‘त्यांना फक्त तरुण अभिनेत्यांसोबत काम करायचं असतं…’, अनिल कपूर यांचं बॉलीवूड अभिनेत्रींबाबत मोठं वक्तव्य

Feb 24, 2026 | 03:05 PM
Crime News: तरुणाला नोकरीचे आमिष दाखवले अन्…; वैभववाडीमध्ये घडले काय?

Crime News: तरुणाला नोकरीचे आमिष दाखवले अन्…; वैभववाडीमध्ये घडले काय?

Feb 24, 2026 | 03:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.