आरोग्य अभियान कर्मचारी अद्यापही वेतनापासून दूरच; मागील तीन महिन्यांपासून...
पुणे : राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या 40 हजारांहून अधिक कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांचे वेतन व मानधनाची देयके काही महिन्यांपासून रखडले आहेत. अनुदान उपलब्ध नसल्यामुळे जानेवारी महिन्याचे वेतन प्रलंबित असून, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे शेवटच्या घटकापर्यंत सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
घरभाडे, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन घरखर्च भागवताना कर्मचाऱ्यांना उधारी-उसनवारी करावी लागत आहे. दर दोन-तीन महिन्यांनी वेतन रखडते. किती वेळा आणि कोणाकडून उधार घ्यायचे? असा सवाल कर्मचारी उपस्थित करत आहेत. एकूणच, बहुतांश जिल्ह्यांत डिसेंबरपर्यंतची देयके अदा झाली असली तरी जानेवारी महिन्यासाठी अनुदान उपलब्ध नसल्यामुळे वेतन, मानधन व प्रोत्साहन भत्ते प्रलंबित आहेत.
पुणे जिल्ह्यात डिसेंबर २०२५ पर्यंत वेतन अदा झाले असले, तरी जानेवारी २०२६ साठी अनुदान उपलब्ध नसल्याने वेतन प्रलंबित आहे. आशा स्वयंसेविकांचे मानधन नोव्हेंबरपर्यंत देण्यात आले असून, डिसेंबर व जानेवारी महिन्यांची देयके थकीत आहेत. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन भत्ते ऑक्टोबरपर्यंत अदा झाले असून, नोव्हेंबर व डिसेंबरचे प्रस्ताव तयार असले तरी निधी अभावी देयके अदा झालेली नाहीत. एचबीटी व १५ व्या वित्त आयोगांतर्गत डिसेंबरपर्यंतची देयके पूर्ण झाली असून, जानेवारीचे प्रस्ताव सहीसाठी प्रलंबित आहेत.
हेदेखील वाचा : Ashadhi Wari Palkhi 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावरील कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही.त्यामुळे ४२ हजार कर्मचाऱ्यांकडे दैनंदिन जीवण जगण्यासाठी देखील पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
– हर्षल रणवरे, राज्य समन्वयक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघटना.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचा संताप कायम
दुसरीकडे, गेले दोन दिवस मुसळधार पावसाने ठाणे शहर ठप्प झालं होतं. मात्र, आता पाऊस थांबला असला तरी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संताप अजूनही तेवढाच आहे. या रोषात देखील माणुसकीचं दर्शन दिसले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी रुग्णांसाठी अनेकांनी स्वखुशीने रक्तदान केलं यातून हेच समोर आलं की, संघर्ष फक्त हक्कांसाठी नाही, तर कर्तव्य निभावण्यासाठीही असतो.
हेदेखील वाचा : Pawan Hans Helicopter: अवघ्या काही क्षणात होत्याच नव्हत झालं! ७ जणांना घेऊन जाणारे पवन हंस हेलिकॉप्टर






