फोटो सौजन्य - Social Media
भारतीय टपाल विभागामध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय टपाल विभागात काम करू पाहण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. मुळात, उमेदवारांना या भरतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर नक्कीच ताबडतोब अर्ज करा. या भरती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हे लेख संपूर्ण वाचा.
भारतीय टपाल विभागाने या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर केली होती. उमेदवारांना त्या अधिसूचनेचा आढावा घेता येणार आहे. मुळात, या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना २५,००० रिक्त जागांसाठी नियुक्ती मिळवता येणार आहे. एकूण २५ हजार रिक्त जागांना भरण्यासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे या भरतीमध्ये नियुक्ती मिळवण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही आहे. या भरतीसाठी आयोजित नियुक्तीच्या प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आहे.
भारतीय टपाल विभागामध्ये आयोजित या भरतीमध्ये पोस्टमन पदासाठी उमेदवारांना नियुक्त केले जाणार आहे. तसेच या विभागातील इतर पदे जसे कि ग्रामीण डाक सेवक, मेल गार्ड, सहाय्यक अधीक्षक, मल्टी टास्किंग स्टाफ तसेच मेल गार्डच्या रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदांसाठी काम करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही निकष पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत.
एकंदरीत, उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डातून SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने गणित तसेच इंग्रजी विषयात उत्तम गन मिळवले असणे आवश्यक आहे. उमेदवाराने संगणकाचे प्रशिक्षण घेतले असावे तसेच संगणकासंबंधित ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. अधिसूचनेमध्ये नियुक्त उमेदवारांना नक्की किती वेतन देण्यात येईल? याबद्दल सांगण्यात आले आहे. मुळात, नियुक्त उमेदवाराला एकूण १०,००० रुपये इतके वेतन देण्यात येईल. अनुभवानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल.
भारतीय टपाल भरतीच्या या प्रक्रियेत अर्ज करण्याची सुरवात ३ मार्च २०२५ पासून करता येणार आहे. तर ही अर्ज प्रक्रिया २८ मार्च २०२५ पर्यंत सुरु असणार आहे. या वेळोमर्यादेचे पालन करून उमेदवारांना दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज करायचे आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.