फोटो सौजन्य- सोशल मीडिया
AI Study Tricks: कोणत्याही विद्यार्थ्याला विचारले की, अभ्यासादरम्यान त्यांचा सर्वात जास्त वेळ कुठे वाया जातो? तर त्याचे उत्तर नोट्स शोधणे किंवा प्रश्न सोडवण्यात नाही, तर अभ्यासाच्या तयारीमध्ये मिळेल. योग्य नोट्स शोधणे, कठीण विषयांचा सोपा अर्थ समजून घेणे किंवा परीक्षेपूर्वी स्टडी प्लॅन तयार करणे. या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांचे तासनतास निघून जातात. पण आता कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धत वेगाने बदलत आहे.
लॅपटॉप ब्रँड ‘प्राइमबुक’चे सीईओ आणि सह-संस्थापक चित्रांशु महंत यांच्या मते, AI चा खरा फायदा केवळ काम लवकर संपवणे हा नाही. याचा खरा उद्देश विद्यार्थ्यांचा तो वेळ वाचवणे आहे जो विनाकारणच्या कष्टांमध्ये जातो, जेणेकरून ते आपले संपूर्ण लक्ष संकल्पना खोलवर समजून घेण्यावर केंद्रित करू शकतील. जर योग्य पद्धतीने वापर केला, तर AI मुळे अभ्यासाचा वेळ अर्धा होऊ शकतो. जाणून घ्या असे ३ जादूई AI ट्रिक्स, जे तुमचा अभ्यास सोपा आणि अतिशय स्मार्ट बनवतील.
प्रथम अभ्यास सोपा करण्यासाठी याची सुरुवात कुठून करायची हे माहीत असणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिसिटी, इकॉनॉमिक्स किंवा ट्रिग्नोमेट्री यांसारख्या कठीण विषयांचे शब्दच डोके फिरवून टाकतात. सोप्या भाषेत अर्थ शोधण्यासाठी विद्यार्थी गुगल आणि यूट्यूबवर अर्धा तास वाया घालवतात.
AI ची मदत कशी घ्यावी?
वेगवेगळ्या वेबसाइटवर भटकण्यापेक्षा तुम्ही थेट AI ला सांगू शकता की, तो विषय अगदी सोप्या भाषेत एखाद्या रिअल-लाइफ उदाहरणासह समजवून सांगावा. जेव्हा बेसिक गोष्टी आधीच समजतील, तेव्हा पुस्तक वाचणे खूप सोपे आणि मजेशीर वाटू लागेल.
कोणत्याही परीक्षेच्या अगदी एक रात्र आधी ५०-६० पानांच्या नोट्स पुन्हा वाचणे एखाद्या वाईट स्वप्नासारखे वाटते. तणावामध्ये विद्यार्थी सहसा सर्वकाही पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करतात.
AI ची मदत कशी घ्यावी?
तुम्ही AI ला संपूर्ण चॅप्टर समराइज करण्यासाठी, मुख्य पॉईंट्स काढण्यासाठी, फॉर्म्युला लिस्ट बनवण्यासाठी किंवा स्वतःची परीक्षा घेण्यासाठी छोटी क्विझ तयार करण्यास सांगू शकता. यामुळे लगेच कळेल की कोणता टॉपिक मजबूत आहे आणि कुठे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
अभ्यास निष्प्रभ होण्याचे एक मोठे कारण म्हणजे विद्यार्थी वारंवार हाच विचार करण्यात वेळ वाया घालवतात की यानंतर कोणता विषय वाचायचा आहे.
AI ची मदत कशी घ्यावी?
AI ला सांगा की परीक्षेत किती दिवस बाकी आहेत, कोणते विषय वाचायचे आहेत आणि तुम्ही दररोज किती तास देऊ शकता. AI एक प्रॅक्टिकल टाईम-टेबल तयार करेल, मोठे चॅप्टर्स लहान-लहान गोलांमध्ये वाटून देईल आणि रिव्हिजनची योग्य वेळ देखील सांगेल.
AI in Management Education: एआयच्या युगात व्यवस्थापन शिक्षणात कसे बदल होत आहेत? जाणून घ्या सविस्तर!
AI तुमचा अभ्यास नक्कीच सोपा करतो, पण खरा अभ्यास मेंदू चालवल्यानेच होतो. होमवर्क कॉपी-पेस्ट करणे किंवा AI कडून थेट उत्तरे लिहून जमा करणे म्हणजे फक्त आपला वेळ वाया घालवणे होय. AI चा वापर रिसर्च करण्यासाठी आणि कठीण कॉन्सेप्ट्स समजून घेण्यासाठी करा. तसेच AI कडून मिळालेली माहिती तुमच्या पुस्तकांकडून, शिक्षकांकडून किंवा विश्वासार्ह स्रोतांकडून क्रॉस-चेक नक्की करा.
सध्याच्या काळातील विद्यार्थी भविष्यात कॉलेज आणि नोकऱ्यांमध्येही AI चा वापर करतील. योग्य प्रश्न विचारणे, योग्य आणि चुकीची माहिती यातील फरक समजणे आणि जबाबदारीने तंत्रज्ञानाचा वापर करणे हे आजचे सर्वात मोठे डिजिटल स्किल आहे.






