पुण्याच्या रस्त्यावर धावली दुबईची 'Polaris Slingshot R' ; सुपरकार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही कार पाहून रस्त्यांवर लोकांची गर्दी जमली आहे. लोक मोबाईलकाडून कारचे व्हिडिओ शूट करत आहेत. काही क्षणांतच याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या पुणेकरांमध्ये या अनोख्या कारची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या रस्त्यांवरही असाच अद्भुत नजारा पाहायला मिळला होता. दिल्लीच्या रस्त्यांवरही दुबईतील अनेक सुपरकार्स पाहायला मिळाल्या होत्या पाहून लोक दंग झाले होते.
या लक्झरी सुपरकारची रचना अगदी अनोखी आहे, लो-स्लंग बॉडी, डॅशिंग स्पोर्टी लूकमुळे ही सुपरकार लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. पुण्याच्या रस्त्यांवर अशी कार पाहायला मिळणे हे दुर्मिळच म्हणायचे. लोक रस्त्यांवर थांबून या कारकडे बघत आहे, याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. पोलारस स्लिंगशॉट आर ही साधी कार नसून ती रोडस्टार आणि सुपरबाईकचे मिश्रण आहे. या कारला पुढे दोन चाकं आणि मागे एकच चाक आहे. ही कार अतिशय वेगवान आहे. जगातील सर्वात लोकप्रिय स्पोर्ट्स कारपैकी एक या कारला ओळखले जाते.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दुबईची ओळखल असलेल्या या सुपरकारचा व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहे. ज्या लोकांना ही कार पाहायला मिळाला नाही ते सतत व्हिडिओ पाहत आहे. अशी महागडी आणि दुर्मिळ कार पुण्याच्या रस्त्यांवर दिसने ही मोठी गोष्ट मानली जात आहे. पुणे आता दुबईला टक्कीर देत आहे का असा प्रश्न सर्वजण करत आहेत.
आधी घेतला आशिर्वाद अन् मारला डल्ला; भक्तच बनला चोर, Video तुफान व्हायरल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






