फोटो सौजन्य - Sri Lanka Cricket सोशल मिडिया
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना 7 जानेवारी रोजी पार पडला, या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये श्रीलंकेला पराभूत करुना मालिकेत विजयी सुरूवात केली आहे. या पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने साहिबजादा फरहानच्या अर्धशतकाच्या खेळीच्या जोरावर सामन्यात विजय मिळवला. शादाब खानच्या अष्टपैलू कामगिरीमुळे पाकिस्तानने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा सहा विकेट्सने पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ १९.२ षटकांत १२८ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानने १७ व्या षटकात केवळ चार विकेट्स गमावून लक्ष्य पूर्ण केले. या विजयासह, पाहुण्या पाकिस्तान संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शदाब खान सामन्याचा हिरो ठरला. त्याने दोन विकेट्स घेतल्या आणि नाबाद १८ धावा केल्या. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आघाचा निर्णय योग्य ठरला. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली.
तिसऱ्या षटकात सलमान मिर्झाने कामिल मिशाराला कॅप्टन आघाने झेलबाद केले. कामिलने त्याचे खातेही उघडले नाही. श्रीलंकेची दुसरी विकेट १५ धावांवर पडली. सलामीवीर पथुम निस्सांका १२ चेंडूत फक्त १२ धावा करू शकला. यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने १५ चेंडूत १४ धावांची संथ खेळी केली. त्याच्याशिवाय धनंजय डी सिल्वाने १०, चरिथ असलंकाने १८, वानिंदू हसरंगा यांनी १८, जानिथ लियानागे यांनी ४० आणि कर्णधार दासुन शनाका यांनी १२ धावा केल्या. दुष्मंथ चामीरा आपले खाते उघडू शकला नाही. तर महेश थीकशनाने १ धाव घेतली. सलमान मिर्झा आणि अब्रार अहमदने ३-३ बळी घेतले. शादाब खान आणि मोहम्मद वसीम यांनी २-२ बळी घेतले.
A complete performance sees Pakistan edge out Sri Lanka in the first T20I 👊#SLvPAK 📝: https://t.co/LNJPVCSiJW pic.twitter.com/JqvXNRBDc6 — ICC (@ICC) January 7, 2026
१२९ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. साहिबजादा फरहान आणि सैम अयुब यांनी ३५ चेंडूत ५९ धावांची सलामी भागीदारी केली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात महेश तीक्षना यांनी सैम अयुबला बाद केले. अयुबने १८ चेंडूत २४ धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि एक षटकार होता. त्यानंतर फरहानने कर्णधार आघासोबत ३५ धावांची भागीदारी केली.
कर्णधार आघाने ११ चेंडूत १६ धावा केल्या. अर्धशतक झळकावल्यानंतर फरहान झेलबाद झाला. त्याने ३६ चेंडूंचा सामना केला आणि ५१ धावा केल्या. या खेळीदरम्यान, पाकिस्तानी सलामीवीराने ४ चौकार आणि २ षटकार मारले. फखर जमान १० चेंडूत फक्त ५ धावा करू शकला. उस्मान खान ७ धावांवर नाबाद राहिला, तर शादाब १२ चेंडूत १८ धावांवर नाबाद राहिला.






