प्रत्येक विद्यार्थ्यांनी अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा विकास केला पाहिजे, असा सल्ला मोहिते पाटील यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सृजनरंग महोत्सवामध्ये क्रिकेट, रांगोळी, वक्तृत्व, पोस्टर, मेहंदी, मोबा ईल रील व फोटो स्पर्धा व फॅशन शो स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी झालेल्या कलाकारांचा तसेच विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचा सन्मान व सत्कार प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन प्रमुख अतिथी स.म. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रारंभी विद्यार्थी, विद्याथ्यांनी प्रेमाची लावणी गीत, फोक आर्केष्ट्रा, हुंडाबंदी गीत, अभंग वाणी इत्यादी कलाप्रकार सादर केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ व संधी मिळावी यासाठी कार्यक्रमाचे सुनियोजन सृजनरंग कार्यक्रम समन्वयक डॉ. विश्वनाथ आवड यांनी केले. पुढे त्यांनी बक्षीस वितरणाचे वाचन केले.
कार्यक्रमाला मान्यवरांची लाभली उपस्थिती
कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तात्या एकतपुरे, वसंत जाधव, महादेव आंधारे व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रणजितसिंह माने देशमुख, डॉ. हनुमंत आवताडे, डॉ. सतीश देवकर, ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. अरविंद शेंडगे, महाविद्यालयाचे प्रबंधक राजेंद्र बामणे, कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे तसेच महाविद्यालयातील सिनियर, तसेच महाविद्यालयातील ज्युनिअर, व्यावसाय विभागातील प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी वर्ग व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. झाकीर सय्यद व प्रा. विनायक सूर्यवंशी यांनी केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. जनार्धन परकाळे यांनी आभार मानले.
Ans: शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह (मोहिते) पाटील हे प्रमुख वक्ते होते.
Ans: विद्यार्थ्यांनी कॉलेज शिक्षणासोबत किमान एक तरी सृजनात्मक कला अवगत करावी व अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा विकास करावा, असा संदेश त्यांनी दिला.
Ans: क्रिकेट, रांगोळी, वक्तृत्व, पोस्टर, मेहंदी, मोबाईल रील, फोटो स्पर्धा तसेच फॅशन शो अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.






