फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे भरती सेल (RRC), उत्तर पश्चिम रेल्वे (NWR), जयपूरतर्फे ॲक्ट अप्रेंटीस (Act Apprentice) भरती 2025-26 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोटिफिकेशन क्र. 04/2025 (NWR/AA) दिनांक 26 सप्टेंबर 2025 नुसार या भरतीद्वारे एकूण 2,162 अप्रेंटीस पदे विविध विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत. यात अजमेर, बिकानेर, जयपूर, जोधपूर तसेच वर्कशॉप्सचा समावेश आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 03 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होऊन 02 नोव्हेंबर 2025 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) चालेल. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ [www.rrcjaipur.in](http://www.rrcjaipur.in) येथे अर्ज करावा.
DRM ऑफिस अजमेर येथे 426 जागा रिक्त आहेत. DRM ऑफिस बिकानेर येथे ४७५ जागा रिक्त आहेत. DRM ऑफिस जयपूर येथे ५४५ तर DRM ऑफिस जोधपूर येथे 450 जागा रिक्त आहेत. BTC कॅरेज अजमेर येथे 68 जागा रिक्त आहेत. BTC लोको अजमेरमध्ये 68 जागा तर कॅरेज वर्कशॉप बिकानेरमध्ये 33 जागा रिक्त आहेत. कॅरेज वर्कशॉप जोधपूर येथे 68 जागा असून एकूण 2162 पदे येथे रिक्त आहे.
उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण (50% गुण आवश्यक) असावा. तर त्याच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. वय 02 नोव्हेंबर 2025 रोजी 15 ते 24 वर्षांदरम्यान असावे.
निवड मॅट्रिक (10वी) व ITI गुणांच्या आधारे तयार केलेल्या मेरिट लिस्टनुसार होईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणी केली जाईल.
अर्ज शुल्क
अशा प्रकारे करता येईल अर्ज