फोटो सौजन्य - Social Media
बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे. गेल्या काही दिवसांत काही बॅंकांनी विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या बँकांमध्ये काही सरकारी क्षेत्रातील तर काही खाजगी क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एका बँकेमध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे अर्ज करण्याच्या प्रक्रियेलाही सुरु करण्यात आले आहे. सप्टेंबरच्या २७ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पद भरले जाणार आहेत.
हे देखील वाचा : भारतीय रेल्वेमध्ये भरतीला सुरुवात; १० वी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज
अहमदनगर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने आयोजित केलेल्या या भरतीच्या माध्यमातून एकूण ७०० रिक्त पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्याचे योजिले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये क्लर्क पदासाठी रिक्त असलेल्या ६८७ जागा, सिक्योरिटी गार्डसाठी ५ जागा, ड्राइवरसाठी ४ जागा, इनचार्ज फील्ड ग्रेडसाठी एक, डेप्युटी मॅनेजरसाठी एक, मॅनेजरसाठी एक आणि जनरल मॅनेजरसाठी एक असलेल्या रिक्त जागेचा विचार करण्यात येणार आहे.
भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. जनरल मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि इनचार्ज फील्ड ग्रेडसाठी अर्ज करण्याचे शुल्क ८५० रुपये आहे. तर जर उमेदवार क्लर्क पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहे तर त्यांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकांसाठी ६९६ रुपये अर्ज शुल्क आहे. विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिकी अटी आहेत. क्लर्क तसेच सिक्योरिटी गार्डच्या पदासाठी अर्ज कर्ता उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून पदवीधर हवा. तर चालकाच्या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण हवा. शेक्षणिक अटी संदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचवचनेचा आढावा घ्यावा.
हे देखील वाचा : सरकारी नोकरी: भारत सरकारच्या IWAI कंपनीमध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !
अधिसूचनेनुसार, विविध पदांसाठी खालील प्रमाणे वयोमर्यादा विविध आहेत.
जनरल मॅनेजर – ३२ ते ४५ वर्षे
मॅनेजर – ३० ते ४० वर्षे
डेप्युटी मॅनेजर – ३० से ३५ वर्षे
इन चार्ज फील्ड ग्रेड – २८ ते ३२ वर्षे
क्लर्क- २१ ते ४० वर्षे
ड्रायव्हर- २१ ते ४० वर्षे
सिक्योरिटी गार्ड- २१ ते ४५ वर्षे
अशा प्रकारे करता येईल अर्ज
सर्वप्रथम https://adccbanknagar.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.
भरती लिंकवर क्लिक करून आवश्यक ती योग्य माहिती पुरवा.
अर्ज भरून आवश्यक ते दस्तऐवज अपलोड करा.
फॉर्म सबमिट करून घ्या आणि त्याची एखादी प्रत भविष्यातील गरजेसाठी स्वतःजवळ ठेवा.