आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं! रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती, प्रचाराचा खास Video होतोय व्हायरल (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकात की, एक रोबोट डॉग रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. या रोबोटच्या पाठीवर एका पक्षाच्या गटाचा पोस्टर लावण्यात आला आहे. हा ठाकरे बंधुंच्या पक्षाच्या गटाचा प्रचार करताना दिसत आहे. लोक हे पाहण्यासाठी रस्त्यांवर जमले आहे. गाड्यांवरुन जाणारे लोत देखील मागे वलळून पागच आगे. तसेच काहीजण याचे व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेजण आश्चर्यातही पडले आहे. या व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये मार्केटिंग करावी तर अशी असे लिहिलेले आहे. हा व्हिडिओमुळे सोशल मीडियावर सध्या खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा; विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला रोबोटचा व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर @kolte_sonali20 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने एक मत मराठी माणसा साठी अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसऱ्या एकाने एवढंच बघायचं बाकी होतं असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने आता मतदानाचा हक्कही रोबोटलाच द्या असे म्हटले आहे. तर काहींनी उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा जयघोष केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






