फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या संरक्षण क्षेत्रातील नामांकित सार्वजनिक उपक्रमाने Trainee Engineer पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेतून एकूण 119 पदे भरली जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार bel-india.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू असून 9 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
BEL कडून जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांची निवड पूर्णतः लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. ही लेखी परीक्षा 11 जानेवारी 2026 रोजी होणार असून, परीक्षा केंद्र BEL, गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे असणार आहे. परीक्षा एकूण 100 गुणांची असेल. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगचा नियम लागू असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण वजा केले जाणार आहेत.
पदांचा तपशील
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून खालीलपैकी कोणतीही एक पदवी असणे आवश्यक आहे
या भरती प्रक्रियेत कोणतीही मुलाखत न घेता थेट लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत






