फोटो सौजन्य - Social Media
अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी GATE परीक्षा ही एक महत्त्वाची पायरी मानली जाते. जर तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण केली तर अनेक प्रकारचे फायदे मिळतात. सर्वप्रथम, GATE उत्तीर्ण केल्याने तुम्हाला IIT, NIT, IISc सारख्या देशातील दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो, जे उच्च शिक्षणासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. फक्त कॉलेज प्रवेशापुरताच मर्यादित न राहता, GATE उत्तीर्ण होणे संशोधन आणि उच्च शिक्षणाच्या संधींना मोठा पल्ला देते. PhD करण्याचा विचार असलेल्यांसाठी GATE प्रमाणपत्र अनिवार्य असते, आणि ते या मार्गावर पुढे जाण्यासाठी आवश्यक असते.
सरकारी नोकरीच्या संधींमध्येही GATE उत्तीर्ण होणे फारच उपयुक्त ठरते. ONGC, NTPC, BHEL, IOCL सारख्या PSU (Public Sector Undertakings) मध्ये भरतीसाठी GATE स्कोरला प्राधान्य दिले जाते. यामुळे उमेदवारांना चांगल्या वेतनसह स्थिर नोकरी मिळण्याची संधी वाढते. सरकारी क्षेत्रातील या संधीशिवाय, GATE उत्तीर्ण असलेल्यांसाठी संशोधन क्षेत्रातही प्रवेश खुला होतो. DRDO, ISRO सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये फेलोशिपसाठी अर्ज करण्यास पात्रता मिळते, ज्यामुळे देशातील महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होते.
तसेच, GATE उत्तीर्ण होणे केवळ शिक्षण किंवा नोकरीपुरताच मर्यादित नसून, व्यक्तीच्या व्यावसायिक आणि आर्थिक उन्नतीसाठीही फायदेशीर ठरते. उत्तम स्कोअर केल्यास विविध कंपन्यांमध्ये करिअर वाढीसाठी स्पर्धात्मक फायदा मिळतो. त्यामुळे, अभियांत्रिकी क्षेत्रात चांगले भविष्य घडवण्यासाठी, सरकारी नोकरी किंवा संशोधनामध्ये करिअर करण्यासाठी, आणि उच्च शिक्षणाच्या संधी मिळवण्यासाठी GATE परीक्षा उत्तीर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य तयारी आणि प्रयत्नांनी GATE उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनते आणि त्यांना वैयक्तिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते.
जर तुम्ही GATE उत्तीर्ण करू इच्छिता पण तुमचा हेतू केवळ प्रवेश प्रक्रिया पास करणे आहे तर तुमचे उद्दिष्ट चुकत आहेत. यातून PhD, सरकारी क्षेत्र, बाहेर देशात जाऊन शिकण्याची संधी तसेच PSU मध्ये स्थिर नोकरी अशा अनेक सुवर्णसंधीचे दार तुम्ही खुले करू शकता.