फोटो सौजन्य - Social Media
आजच्या घडीला सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ने हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर-RO आणि रेडिओ मेकॅनिक-RM) पदांसाठी भरती प्रक्रिया 2025 सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे एकूण 1121 पदे भरण्यात येणार असून, त्यापैकी 910 पदे हेड कॉन्स्टेबल (RO) आणि 211 पदे हेड कॉन्स्टेबल (RM) साठी राखीव आहेत. इच्छुक उमेदवार 23 सप्टेंबर 2025 पर्यंत BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी अर्जदारांचे शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण आणि संबंधित शाखेत 2 वर्षांचा ITI डिप्लोमा असणे आवश्यक आहे. रेडिओ ऑपरेटरसाठी ITI डिप्लोमा रेडिओ, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स, COPA, जनरल इलेक्ट्रॉनिक्स किंवा डेटा एंट्री ऑपरेटरमध्ये असावा, तर रेडिओ मेकॅनिकसाठी रेडिओ, टेलिव्हिजन, जनरल इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर हार्डवेअर, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, IT आणि ESM इत्यादी विषयांचा समावेश असावा. वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असून, राखीव प्रवर्गाला शासन नियमांनुसार सवलत मिळेल.
उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत होईल: फिजिकल स्टँडर्ड टेस्ट (PST) व फिजिकल एफिशिएन्सी टेस्ट (PET), कंप्युटर बेस्ड टेस्ट (CBT) आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV). PST मध्ये पुरुष उमेदवारांची उंची किमान 168 से.मी. तर महिलांची उंची 157 से.मी. असावी; पुरुष उमेदवारांचा छातीचा घेर 80–85 से.मी. असावा. PET मध्ये धावणे, लाँग जंप व हाय जंप यांचा समावेश असेल. CBT परीक्षेत रेडिओ ऑपरेटरसाठी 250 गुणांचा (200 गुण CBT + 50 गुण डिक्टेशन) पेपर तर रेडिओ मेकॅनिकसाठी 200 गुणांचा पेपर होईल. अंतिम टप्प्यात उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे मूळ स्वरूपात पडताळणीसाठी सादर करावी लागतील.
निवड झालेल्या उमेदवारांना 7वा वेतन आयोग (Pay Level-4) नुसार वेतन मिळेल, ज्यामध्ये सुरुवातीला 25,500 रुपये बेसिक वेतन आणि भत्त्यांसह कमाल 81,100 रुपयेपर्यंत पगार मिळू शकतो. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी BSF वेबसाइटवर जाऊन “Head Constable RO/RM Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी (New Registration) करावी, अर्ज फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फी भरावी आणि अंतिम सबमिशन केल्यानंतर प्रिंटआउट घ्यावा. या भरतीद्वारे तरुणांना सीमा सुरक्षा दलात मानाचे आणि स्थिर करिअर मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.