फोटो सौजन्य - Social Media
Naval Dockyard, Mumbai अंतर्गत Dockyard Apprentice School मार्फत अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 286 पदे भरण्यात येणार असून ही भरती Apprentices Act 1961 आणि Apprentices Rules 1992 अंतर्गत केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी ITI उत्तीर्ण उमेदवारांसोबतच फ्रेशर विद्यार्थ्यांनाही अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया 1 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांना 22 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शैक्षणिक पात्रतेनुसार ITI ट्रेड्ससाठी उमेदवार ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Non-ITI पदांसाठी क्रेन ऑपरेटरसाठी किमान 10वी उत्तीर्ण, तर रिगर पदासाठी किमान 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेनुसार Non-hazardous ट्रेड्ससाठी किमान वय 14 वर्षे ठेवण्यात आले आहे, तर Hazardous ट्रेड्ससाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असणे बंधनकारक आहे. उमेदवाराचा जन्म 30 नोव्हेंबर 2011 पूर्वी झालेला असावा, तर वरची वयोमर्यादा लागू राहणार नाही. या भरतीमुळे अनेक तरुणांना संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
Naval Dockyard, Mumbai अंतर्गत अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांना लिखित परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर पात्र उमेदवारांचे दस्तावेज पडताळणी होईल आणि शेवटी वैद्यकीय तपासणी घेतली जाणार आहे. या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी ठरलेले उमेदवार Dockyard Apprentice School मध्ये प्रशिक्षण घेण्यास पात्र ठरतील.
या भरतीसाठी महाराष्ट्रासह देशभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली असून उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे तसेच वयाचा पुरावा अपलोड करणे अनिवार्य आहे. संरक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची ही एक उत्तम संधी असून ITI उत्तीर्णांसोबतच 8वी आणि 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी ही भरती सोन्याची संधी ठरणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास विलंब न करता या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नेव्हल डॉकयार्ड प्रशासनाने केले आहे.