फोटो सौैजन्य - Social Media
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करू पाहणार्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ४,५०० रिक्त पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. शेवटची तारीख देण्यात आली आहे. उमेदवारांना २३ जून २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना परीक्षा पात्र करावी लागणार आहे. ही परीक्षा जुलै २०२५ महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. उमेदवारांना २५ जूनपर्यंत अर्ज शुल्क भारत येणार आहे. ४५०० रिक्त अप्रेन्टिस जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी काही पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत.
शैक्षणिक अटीनुसार कोणत्याही मान्यता प्राप्त क्षेत्रातून पदवीधर असणाऱ्या उमेदवाराना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या भरतीसाठी किमान आयु २० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत 2025 साली अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. निवड तीन टप्प्यांत होणार आहे. सर्वप्रथम 100 गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही. दुसऱ्या टप्प्यात उमेदवाराची स्थानिक भाषा वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे यामध्ये चाचणी घेतली जाईल. शेवटी पात्र उमेदवारांचे दस्तावेज पडताळणी (Document Verification) होईल. अंतिम निवड मेरिट लिस्टच्या आधारे होणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://www.centralbankofindia.co.in या वेबसाईटवर जाऊन “Apprentice Recruitment 2025” लिंकवर क्लिक करावे. नोंदणी करून लॉगिन केल्यानंतर फॉर्म भरणे, कागदपत्रे अपलोड करणे व शुल्क भरून अर्ज सबमिट करावा.