फोटो सौजन्य - Social Media
तुम्ही खवय्या असाल, तर ही नोकरी तुमचं स्वप्न साकार करू शकते! कारण यात केवळ खाण्याचं, चव चाखण्याचं काम आहे… आणि त्यासाठी दिला जातोय दरवर्षी 21.50 लाखांचा भपक पगार! मात्र त्यासाठीची पात्रता वाचून तुमच्या भुवया उंचावल्या जातील. चीनमधील टॉप रँकिंग विद्यापीठांपैकी एक साउथईस्ट युनिव्हर्सिटी, नानजिंग यांनी त्यांच्या कॅन्टीनसाठी कॅन्टीन मॅनेजर पदासाठी जाहिरात दिली आहे. पण या नोकरीच्या अटी आणि पगार ऐकून लोकांना आश्चर्य झाला आहे.
या नोकरीसाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दररोज कॅन्टीनमध्ये जेवण तयार होतंय का, त्याची पाहणी करावी लागेल. अन्नाची गुणवत्ता करणे आणि चव तपासणे अशा काही जबाबदारी त्यांना पार पाडाव्या लागतील. तसेच त्या ठिकाणी सर्व स्वच्छ राहील याची जबाबदारी घ्यावी लागेल. अन्न पुरवणाऱ्यांशी संबंध येतील तसेच काही कागदपत्रांची देखरेख करावी लागेल. म्हणजे थोडक्यात, फूड ऑडिटर + टेस्टर + मॅनेजर अशी भूमिका असणार आहे. या पदासाठी एकूण २५,००० UAS डॉलर्स वार्षिक पगार ठरवण्यात आला आहे. हा पगार एका कॅन्टीन मॅनेजरसाठी खूपच जास्त मानला जातोय. पण अटीही तशाच खास आहेत.
पण हे ऐकून लगेच आनंदित होऊ नका. या नोकरीसाठी PhD (डॉक्टरेट पदवी) अनिवार्य आहे. विशिष्ट फील्ड जसे अन्न, पोषण, डायटेटिक्स, फूड टेक्नॉलॉजी किंवा संबंधित क्षेत्रामध्ये शिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच MS Office आणि संगणकीय कौशल्य असणे आवश्यक मानले जात आहे. अर्ज कर्त्याला अस्खलित इंग्रजीचं ज्ञान अपेक्षित आहे आणि अनुभव असणे आवश्यक आहे. या सर्व अटींना पात्र उमेदवारानेच या नोकरीचे स्वप्न पाहावेत.
काही लोकांनी हे देखील म्हटलं की चीनमध्ये शिक्षण आणि नोकरी यांचं प्रमाण इतकं टोकाला गेलंय की पीएचडी असलेल्यांनाही साधी नोकरी मिळायला कठीण जातं, म्हणून कंपन्या अशा अटी ठेवत आहेत.