नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) तर्फे जॉइंट सीएसआईआर यूजीसी नेट जून 2024 परीक्षे साठी सिटी स्लिप जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांनी CSIR UGC NET 2024 साठी अर्ज भरला आहे. असे उमेदवार https://csirnet.nta.ac.in या वेबसाईटवरुन सिटी स्लिप डाऊनलोड करु शकतात. या सिटी स्लिपमुळे उमेदवारांना त्याचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल याची माहिती मिळणार आहे. सिटी स्लिपमुळे केवळ शहर कळू शकते .अॅडमिट कार्ड लवकरच जाहीर करण्यात येतील ज्यामध्ये परीक्षार्थींना वेळ केंद्र कळेल.CSIR UGC NET ही परीक्षा कनिष्ठ संशोधन फेलोशिप अनुदान (JRF) आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता ठरवते.
CSIR UGC NET 2024 परीक्षा तारखा, सत्रे
२५ जुलै ते २७ जुलै या दरम्यान जून सत्राच्या जॉइंट सीएसआईआर यूजीसी नेट परीक्षे चे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा २ सत्रांमध्ये होणार आहे. ही परीक्षा कंप्यूटर बेस्ड टेस्ट मोड असणार आहे. Earth, atmospheric , महासागर आणि ग्रह विज्ञान, भौतिक विज्ञान आणि गणित विज्ञान या परीक्षा २५ जुलै रोजी, लाइफ सायन्सेस २६ जुलै आणि केमिकल सायन्सेसच्या परीक्षा २७ जुलै रोजी होणार आहेत. . परीक्षेचे पहिले सत्र सकाळी ९ ते १२ पर्यंत असेल तर दुसरे सत्र ३ ते ६ पर्यंत असेल. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना परीक्षेचे अॅडमिट कार्डसोबत, पडताळणीकरिता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लाइन्सेस, पासपोर्ट इत्यांदी पैकी एक सोबत ठेवावे लागणार आहे.
CSIR UGC NET 2024 नेट परीक्षा सिटी स्लिप डाऊनलोड करण्यासाठी






