फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (DDA) मध्ये नोकरीची संधी मिळवण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. डीडीएकडून ग्रुप A, B आणि C या गटांतील विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 1732 पदांसाठी होणार असून, इच्छुक उमेदवारांनी निश्चित वेळेत ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. अर्ज प्रक्रिया 6 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 नोव्हेंबर 2025 आहे. उमेदवार फक्त अधिकृत संकेतस्थळ dda.gov.in वरच अर्ज करू शकतील.
या भरतीसंदर्भात सध्या केवळ शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगारमान आणि इतर अटींची सविस्तर माहिती लवकरच अधिकृत विस्तृत अधिसूचनेद्वारे दिली जाणार आहे. तरीसुद्धा, उमेदवारांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विविध महत्त्वाच्या पदांचा या भरतीमध्ये समावेश आहे. यात डिप्टी डायरेक्टर (आर्किटेक्ट, पब्लिक रिलेशन, प्लॅनिंग), असिस्टंट डायरेक्टर (प्लॅनिंग, आर्किटेक्ट, सिस्टिम, लँडस्केप, मिनिस्ट्रियल), असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल व इलेक्ट्रिकल), लीगल असिस्टंट, प्लॅनिंग असिस्टंट, आर्किटेक्चरल असिस्टंट, प्रोग्रामर, जूनियर इंजिनिअर (सिव्हिल व इलेक्ट्रिकल/मेकेनिकल), सेक्शनल ऑफिसर (हॉर्टिकल्चर), नायब तहसीलदार, जूनियर ट्रान्सलेटर, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सर्वेयर, स्टेनोग्राफर, पटवारी, जूनियर सेक्रेटेरियट असिस्टंट, माळी आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) यांसारख्या पदांचा समावेश आहे.
या सर्व पदांमध्ये सर्वाधिक भरती मल्टी टास्किंग स्टाफसाठी (745 पदे) होणार आहे. त्यानंतर माळी (282 पदे) आणि जूनियर सेक्रेटेरियट असिस्टंट (199 पदे) ही पदे आहेत. याशिवाय, अभियंते, डायरेक्टर आणि अधिकारी स्तरावरील अनेक महत्त्वाची पदे देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे तांत्रिक, प्रशासकीय आणि सहाय्यक स्तरावरील उमेदवारांना समान संधी मिळणार आहे.
या भरतीत निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. डीडीएकडून आधीच संकेत दिला आहे की परीक्षा डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये घेण्यात येऊ शकते. परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षा तारखेच्या काही दिवस आधीच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेसोबतच वेळोवेळी संकेतस्थळावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. सरकारी नोकरी ही केवळ रोजगाराची संधी नसून स्थिर भवितव्याची हमीही आहे. दिल्लीसारख्या राजधानीत डीडीएमध्ये नोकरी मिळाल्यास केवळ पगारच नव्हे तर सुविधा, प्रतिष्ठा आणि सुरक्षितता देखील मिळणार आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करणे आवश्यक आहे.