सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने दांडी मारल्याने शेती पाण्याविना करपू लागली आहे… माण तालुक्यातील म्हसवड, दहिवडी परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी २९ गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मका, बाजरी, तूर, चवळी, मूग आणि ऊस अशी पिकं पाण्याअभावी करपू लागली आहेत. बनगरवाडीमध्ये तर परिस्थिती आणखी गंभीर आहे. पाण्याअभावी गाव सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, दिवाळीपर्यंत संपूर्ण गाव गावामध्ये असेल का? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे .टेंभू योजनेतून आणि तारळी धरणातून तातडीने पाणी सोडावं अशी भावनिक मागणी बनगरवाडीतील ग्रामस्थांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. उरलेली १० ते २० टक्के पिकं तरी वाचवण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत.राजकारण न करता आधी पाणी द्या… अशी आर्त हाक आता बनगरवाडीतील शेतकरी देत आहेत यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी..