फोटो सौजन्य - Social Media
फॉर्म क्रमांक १० भरून झाल्यानंतर उमेदवारांना फॉर्म क्रमांक १७ भरणे आवश्यक आहे. त्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ पासून मुदत देण्यात आली आहे तर उमेदवारांना २ महिन्यांचा कालावधी म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. हा अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. दररोजच्या विलंबासाठी २० रुपये प्रति दिवस शुल्क आकारले जाणार आहे. हे अर्ज करताना अर्ज कर्त्या उमेदवाराकडे शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड आणि पासपोर्ट आकारातील फोटो स्कॅन केलेले असणे आवश्यक आहे, यांची पूर्तता करावी लागणार आहे. आपल्या हातात नावनोंदणी प्रमाणपत्र आल्यावर दिलेल्या मुदतीत अर्ज शुल्क भरावा आणि पडताळणीसाठी देण्यात आलेले मूळ कागदपत्र पुन्हा मागून घ्यावीत.
फॉर्म क्रमांक १० आणि फॉर्म क्रमांक १७ मध्ये फरक काय?
खासगी विद्यार्थ्यांना (म्हणजे नियमित शाळेत न शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना) इयत्ता दहावी किंवा बारावीची परीक्षा देण्यासाठी नोंदणी (Registration) करण्यासाठी फॉर्म क्रमांक १० हा फॉर्म असतो. एकंदरीत, हा फॉर्म मंडळाकडे आपले नाव नोंदवण्यासाठी पहिला टप्पा असतो. हा फॉर्म तेव्हा भरला जातो तेव्हा विद्यार्थी प्रथमच खाजगीरित्या परीक्षा देणार असतात.
फॉर्म क्रमांक १७ हा हा फॉर्म खासगी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेसाठी अर्ज (Application) करण्यासाठी भरायचा असतो. हा दुसरा टप्पा असतो नोंदणी झाली की परीक्षा देण्यासाठी परीक्षेचा अर्ज करण्यासाठी हा फॉर्म असतो.






