फोटो सौजन्य - Social Media
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ०५४/२०२५ क्रमांकाच्या अधिसूचनेनुसार १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या एमपीएससी अभियांत्रिकी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेले असणे अनिवार्य आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असून, उमेदवारांनी बार्टीच्या अधिकृत लिंकवर जाऊन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी आणि आवश्यक माहिती भरण्यासाठी https://forms.gle/nkVisRqm-ndp1qpAM9 या लिंकवर फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची स्व-साक्षांकित प्रत व आवश्यक कागदपत्रे बार्टी, पुणे कार्यालयात प्रत्यक्ष पाठविणे बंधनकारक आहे.
अर्जाची प्रत २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बार्टी कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता — डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८, कीन्स गार्डन, कॅम्प, पुणे – ४११००१ असा आहे. अर्जाच्या लिफाफ्यावर स्पष्टपणे ‘एम.पी.एस.सी. अभियांत्रिकी २०२५ मुलाखतीसाठी आर्थिक सहाय्य’ असे नमूद करणे अनिवार्य असल्याचे बार्टी कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे. अर्जासंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ०२०-२६३३३३३० किंवा ०२०-२६३३३३३९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. एकाच उमेदवाराने वेगवेगळी माहिती भरून एकापेक्षा जास्त वेळा अर्ज केल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ही योजना अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणवंत उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांमधील शेवटचा टप्पा यशस्वीरीत्या पार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास बार्टी प्रशासनाने व्यक्त केला आहे.






