फोटो सौजन्य- iStock
बँक भरतीची तयारी करत असलेले उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या 1040 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरती परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक पात्र उमेदवार 08 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतो.
एक उमेदवार एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करु शकतो
स्टेट बँक ऑफ इंडियाची ही भरती 5 वर्षाच्या करारावर आधारित आहे. या भरतीची विशेष बाब म्हणजे या कोणताही उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या पदासाठी भरतीप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उमेदवारास मिळणार आहे.
या पदांसाठी उमेदवार करु शकतात अर्ज
एसबीआयकडून सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड), सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझनेस), रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड, व्हीपी वेल्थ, रिजनल हेड, इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट या पदांची भरती केली आहे. तसेच अधिकारी पदांसाठी रिक्त जागा जारी केल्या आहेत.
उमेदवाराने अर्जा कसा करावा ?
अर्जासंबंधी नोटिफिकेशन – नोटिफिकेशन पीडीएफ