धगधगत्या आगीत उडी मारुन भक्तीचा हुंकार; कृष्णजन्मभूमी मथुरेत होळीच्या अनोख्या प्रथेचा VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मथुरेची होळी केवळ रंगाचा उत्सव नाही, अतूट श्रद्ध आणि विश्वासाचे प्रतीक मानली जाते. या ठिकाणी एक जुनी पंरपरा आहे. एका व्यक्तीची प्रल्हाद म्हणून निवड करण्यात येते आणि त्याला होलिका दहनाच्या आगीतून चालावे लागेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही पंरपरा गेल्या ५२०० वर्षांपासून सुरु आहे. यासाठी प्रल्हाद म्हणून निवड झालेली व्यक्ती ४५ दिवस कठोर तपस्या करते.
या काळात जमिनीवर झोपणे, फलाहर करणे आणि ब्रह्मचार्याचे पालन करणे असे कडक नियम पाळावे लागतात. हळी प्रवेश करण्यापूर्वी दैवी संकेताची वाट पाहावी लागते. दैवी संकेत मिळताच प्रल्हाद म्हणून नियुक्त करण्यात आलेला व्यक्ती आगीतून चालत जातो. यावेळी संजू पंडा नावाच्या व्यक्तीची निवज प्रल्हाद म्हणून करण्यात आली होती. सध्या त्याचा आगीतून चालण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही अनोख प्रथा पाहण्यासाठी केवळ भारतच नव्हे, तर परदेशातूही लोक येतात. यावेळी लोक भक्त प्रल्हाद की जय अशा घोषणा देतात.
व्हायरल व्हिडिओ
#WATCH | Mathura, UP: Following a very long tradition, a person portraying Prahlad walks through the Holika pyre at Phalen village. Sanju Panda, who walked into the pyre, says, “…The preparation for this starts from Basant Panchami to Holika Dahan… At that time, attachment… pic.twitter.com/nzBKyciEG5 — ANI (@ANI) March 3, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरलल होत असलेला व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहे. अनेकांनी हे अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. श्रद्धेच्या नावाखाली लोक जीव धोक्यात घालतात असे अनेकाचे मत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






