iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना
पहिल्या नजरेत दोन्ही आयफोन मॉडेल्स एकसारखेच दिसत आहेत. यामध्ये 6.1-इंच डिस्प्ले, एल्यूमिनियम बॉडी, IP68 रेटिंग आणि फेस आयडी सपोर्ट देण्यात आला आहे. तथापी, आयफोन 17 ई मध्ये यावेळी एक नवीन रंग सादर करण्यात आला आहे. आता ग्राहक सॉफ्ट पिंक रंगात देखील आयफोन 17 ई खरेदी करू शकणर आहेत. यासोबतच नवीन मॉडेलमध्ये सिरेमिक शील्ड देण्यात आली आहे. नवीन मॉडेलमध्ये एक नवीन एंटी-रेफलेक्टिव कोटिंग दिले आहे, ज्यामुळे सूर्याच्या प्रकाशात देखील डिस्प्ले स्पष्टपणे पाहू शकतो. आधीच्या मॉडेलप्रमाणेच डिव्हाईस 60Hz रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करते. (फोटो सौजन्य – Pinterest)
नवीन आयफोन 17 ई मध्ये A19 चिप आहे, जी 3nm आर्किटेक्चरवर तयार करण्यात आली आहे आणि पॉवर कार्यक्षमतेसह सुधारित एआय कामगिरी देऊ शकते. तर जुन्या आयफोन 16 ई मध्ये A18 चिपसेट देण्यात आली आहे. यासोबतच, नवीन मॉडेलमध्ये नवीन C1X मॉडेम आहे, जो मागील डिव्हाईसेक्षा 2 पट अधिक वेगवान आहे. डिव्हाईसमध्ये वायफाय7 आणि ब्लूटूथ 6 सपोर्ट देण्यात आला आहे.
आयफोन 17 ई ची बॅटरी 26 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक टाईम ऑफर करते. तर 16 ई मध्ये 22 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक टाईम ऑफर केला जातो. नवीन मॉडेलच्या चार्जिंगमध्येही लक्षणीय बदल दिसून येत आहेत, जो आता मॅगसेफ वायरलेस चार्जिंग (15W) ला सपोर्ट करतो, जो 16 ई मध्ये 7.5W क्यूई पेक्षा जास्त आहे. यूएसबी-सी फास्ट चार्जिंग दोन्हीसाठी सामान्य आहे.
दोन्ही डिव्हाईस अॅपल ईंटेलिजेंसला सुपोर्ट करतात आणि iOS 26 सह येतात. दोन्ही फोनमध्ये कॉल स्क्रीनिंग, होल्ड असिस्ट आणि लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन सारखी सर्व वैशिष्ट्ये आहेत. तथापि, A19 चिपमुळे 17e AI टास्क थोडे सोपे आणि जलद चालवेल.
दोन्ही डिव्हाईसमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यावेळी फक्त फरक इमेज प्रोसेसिंगचा आहे, 17 ई आता फोटोंमध्ये प्राणी, कुत्रे आणि मांजरींचे पोर्ट्रेट ऑटो-डिटेक्ट करते आणि डेप्थ डेटा सेव्ह करते. नवीन मॉडेलमध्ये नंतर पोर्ट्रेट देखील अॅडजस्ट करता येतात. स्किन-टोन एचडीआर आणि नॅचरल कलरिंग सुधारले आहे. फ्रंट कॅमेरा 12 मेगापिक्सेलचाच राहतो, कोणतेही अपग्रेड नाही.
आयफोन 17 ईच्या 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 64,900 रुपये आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 84,900 रुपये आहे. आयफोन 16 ई च्या 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 59,900 रुपये, 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 69,900 रुपये आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे.






