या मार्गावर रविवारी विशेष पॉवर ब्लॉक, अनेक लोकल गाड्या होणार रद्द! प्रवाशांचे हाल
दक्षिण मध्य रेल्वे (SCR), सिकंदराबादच्या रेल्वे भरती कक्षाने (RRC) 2024-25 साठी क्रीडा कोट्यातील 61 जागांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया क्रीडापटूंना ग्रुप C आणि ग्रुप D श्रेणीअंतर्गत भारतीय रेल्वेमध्ये सामील होण्याची संधी देते. अर्ज प्रक्रिया 4 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे. तर 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात करायची आहे. आज या भरती संदर्भांत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
RRC SCR क्रीडा कोटा भरती २०२५ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. ग्रुप C साठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून 12वी (10+2 स्तर) किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तर ग्रुप D साठी अर्ज कर्ता उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (मॅट्रिक) किंवा ITI किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर उमेदवार क्रीडा क्षेत्रातील असणे आवश्यक आहे. उमेदवाराचा संबंधित खेळांतील राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने वरिष्ठ/कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा, फेडरेशन कप किंवा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असावी.
अधिसूचनेमध्ये काही वयोमर्यादे संबंधित अटी नमूद करण्यात आल्या आहेत. अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. तर कमाल वयोमर्यादा २५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. वयोमर्यादेत कोणतीही सवलत नाही. सर्व प्रवर्गांना या वयोमर्यादे संबंधित अट लागू आहे. RRC SCR क्रीडा कोटा भरती २०२५ मध्ये निवड प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. नियुक्तीसाठी उमेदवारांना काही टप्पे पार करावे लागणार आहेत. यामध्ये कागदपत्रांची पडताळणी, क्रीडा चाचण्या तसेच अंतिम गुणवत्ता यादीचा समावेश आहे. नियुक्तीसाठी या सर्व टप्प्यांना पात्र करणे अनिवार्य आहे.
RRC SCR क्रीडा कोटा भरती 2025 साठी अर्ज कसा करावा?