फोटो सौजन्य- iStock
दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा या विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. या नंतर तुमचे करिअरचे वेगवेगळे मार्ग निवडता येतात. यामुळे करिअरचे अपेक्षित करिअरचे मार्ग निवडण्यासाठी या परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करत चांगले गुण मिळवणे आवश्यक असतात. या दहावी बारावीच्या परीक्षेकरिता अवघे दोन महिने शिल्लक आहेत. आता अभ्यासाकरिता अंतिम टप्पा सुरु झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येतो मात्र अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास उत्तम कामगिरी करता येते. त्यामुळे या टप्प्यात नेमका कश्याप्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि त्याचे नियोजन कसे असले पाहिजे याबद्दल काही महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया याबद्दल
बोर्डाच्या परीक्षेसाठी अतिंम टप्प्यातील अभ्यासासंबंधी महत्वाच्या टिप्स
वेळापत्रक बनवा : सर्वप्रथम अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळापत्रक बनवणे आवश्यक आहे. अभ्यासासाठी वेळापत्रक बनवून तुम्ही कोणत्या विषयाला किती महत्व द्यायचे हे ठरवा. त्यामुळे तुम्हाला वेळेचा योग्य विभागणी करता येईल.
स्वत:चे नोट्स तयार करा: अभ्यास करताना महत्वाच्या मुद्द्यांचे नोट्स तयार करा. त्यामुळे अभ्यास होणार आहेच शिवाय त्या नोट्समुळे तुम्ही त्या विषयातील एखाद्या घटकाची उजळणी करताना याचा प्रचंड फायदा होणार आहे.
मागील वर्षांचे पेपर सोडवा: विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मागील वर्षाचे पेपर सोडवणे महत्वाचे आहे मागील वर्षांचे पेपर सोडवल्याने तुम्हाला पेपर पॅटर्न लक्षात येतो आणि प्रश्नांच्या स्वरुपाची कल्पना येते. पेपर सोडवताना वेळेच्या व्यवस्थापनावरही भर द्या.
ग्रुप स्टडी करा: मित्रांसोबत ग्रुप स्टडी केल्याने तुमचा निश्चितच फायदा होऊ शकतो. ग्रुप स्टडीमुळे तुम्ही एकमेकांना प्रश्न विचारु शकता आणि तुमच्या शंकांचे निरसनही करु शकता.
तणावमुक्तीसाठी ब्रेक घ्या- अभ्यास केल्यानंतर काही कालावधीसाठी ब्रेक घ्या. त्यावेळेत तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे ती करा. मात्र या दरम्यान वेळेचे भान ठेवा.
सकारात्मक राहा- स्वत:वर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. त्यामुळे अभ्यासही उत्तम होईल.
आरोग्याची काळजी- या अंतिम टप्प्यात अभ्यासासोबत आरोग्याची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. म्हणून नियमित व्यायाम करा, चांगली झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या.
पालक आणि शिक्षकांशी संवाद साधा- जर कोणतीही शंका असल्यास शिक्षकांना विचारा आणि त्या शंकेचे तात्काळ निरसन करा. पालकांशीही मनसोक्त संवाद साधा ज्यामुळे तुम्हाला आधार मिळेल.
दहावी बारावी परीक्षा ही अत्यंत महत्वाची आहे त्याची योग्य व्यवस्थापन करुन तयारी केल्यास नक्कीच घवघवीत यश तुम्हाला मिळू शकते. या बोर्डाच्या परीक्षेचा कोणताही ताण न घेता, उत्तम अभ्यास करा आणि सकारात्मक राहा.