मुंबईकरांसाठी Apple चं स्पेशल सरप्राईज! 'या' ठिकाणी सुरु केलं दुसरं स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या
अॅपलने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांच्या नव्या रिटेल स्टोअरबाबत माहिती शेअर केली आहे. अॅपलने ओपन केलेल्या नवीन स्टोअर हे कंपनीचे भारतातील दुसरे स्टोअर आणि महाराष्ट्रातील तिसरे स्टोअर आहे. कंपनीने मुंबईव्यतिरिक्त पुण्यामध्ये देखील त्यांचे रिटेल स्टोअर चालू केले आहे. आता अॅपलने भारतात मुंबई, दिल्ली, नोएडा, बंगळुरू आणि पुण्यामध्ये त्यांचे रिटेल स्टोअर ओपन केले आहे. याशिवाय अशी माहिती देखील समोर आली आहे की, कंपनी लवकरच हैद्राबादमध्ये एक नवीन स्टोअर ओपन करण्याची तयारी करत आहे. यासंबंधित जॉब लिस्टिंग माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अॅपल रिटेलच्या सीनियर वाइस प्रेसिडेंट डियर्ड्रे ओब्रायनने सांगितलं आहे की, आम्हाला बोरिवलमधील अॅपल स्टोअर ओपन करताना अत्यंत आनंद होत आहे. कंपनी भारतात आणखी विस्तार करण्यासाठी आणि नवीन स्टोअर ओपन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. अॅपलच्या नवीन बोरिवली रिटेल स्टोअरमध्ये आयफोन 17 लाईनअप व्यतिरिक्त तुम्हाला आयफोन एअर, अॅपल वॉच अल्ट्रा 3, अॅपल वॉच सिरीज 11, आयपॅड आणि मॅकच्या नवीन पिढीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, यूजर्स जुने अॅपल डिव्हाइसेस एक्सचेंज करू शकणार आहेत.
अॅपल भारतात त्यांचा विस्तार करण्यासाठी वेगाने प्रयत्न करत आहे. कंपनीने पहिले रिटेल स्टोअर एप्रिल 2023 मध्ये ओपन केले होते. मुंबईनंतर कंपनीने एप्रिलमध्ये दिल्लीमध्ये त्यांचे दुसरे रिटेल स्टोअर ओपन केले होते. गेल्यावर्षी कंपनीने तीन रिटेल स्टोअर ओपन केले होते, ज्यामध्ये बंगळुरु, पुणे आणि नोएडा या शहरांचा समावेश आहे. आयफोनची मागणी भारतात वेगाने वाढत आहे. गेल्या वर्षी कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात लक्षणीय झेप घेतली, चिनी ब्रँडना मागे टाकले. अॅपलने टॉप 5 ब्रँडच्या यादीत प्रवेश केला आहे.






